For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

06:58 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ
Advertisement

दिल्लीत जोरदार तयारी : मंत्रिमंडळात 27-30 मंत्र्यांचा समावेश अपेक्षित, मित्रपक्षांशी चर्चा सुरू

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधानपदासाठी निवडलेल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 27-30 मंत्र्यांचा समावेश अपेक्षित आहे. त्यापैकी जवळपास एक तृतीयांश मंत्री राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांना स्थान देण्यात येणार आहे. त्यात काही राज्यमंत्रीही असतील. मत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी शनिवारी राजनाथ सिंह, अमित शहा आणि जे. पी. न•ा यांची मित्रपक्षांशी चर्चा सुरू होती. मात्र, केंद्रीय मंत्र्यांची अंतिम यादी रविवारच्या शपथविधी सोहळ्यादरम्यानच जाहीर केली जाणार आहे.

Advertisement

नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधान पदासाठी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 293 जागा जिंकल्या. तर भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्मयता आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्मयुरिटी गार्ड (एनएसजी) कमांडो, ड्रोन आणि ‘स्नायपर्स’ तैनात करण्यात आले आहेत. परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, ताज, आयटीसी मौर्य, क्लेरिजेस आणि ओबेरॉय हॉटेल्समध्ये राहतील. त्यामुळे सदर हॉटेल्सनाही कडक सुरक्षा कवचाखाली घेण्यात आले आहे.

पोलीस-एनएसजी कमांडो तैनात

सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे ‘एसडब्ल्यूएटी’ आणि एनएसजी कमांडो तैनात असतील. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी समारंभाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा योजना तयार करण्यासाठी पोलीस मुख्यालय आणि नवी दिल्लीत अनेक बैठका घेतल्या. राष्ट्रपती भवनात शपथविधी होणार असल्याने संकुलाच्या आत आणि बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा असेल. दिल्ली पोलिसांचे कर्मचारी ‘बाह्य वर्तुळात’ तैनात केले जातील, त्यानंतर निमलष्करी दले आणि राष्ट्रपती भवनाचे अंतर्गत सुरक्षा कर्मचारी ‘आंतर वर्तुळा’त तैनात असतील.

जी-20 शिखर परिषदेसारखी व्यवस्था

निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या आणि दिल्ली सशस्त्र पोलीस (डीएपी) कर्मचाऱ्यांसह सुमारे 2,500 पोलीस कर्मचारी घटनास्थळाभोवती तैनात करण्याची योजना आखण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ‘स्नायपर’ आणि सशस्त्र पोलीस कर्मचारी मान्यवर वापरत असलेल्या मार्गांवर तैनात केले जातील. तर महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन तैनात केले जातील. गेल्या वषी झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या वेळी जी व्यवस्था करण्यात आली होती तशीच सुरक्षा व्यवस्था कायम राहण्याची शक्मयता आहे. दिल्लीच्या मध्यभागी जाणारे अनेक रस्ते रविवारी बंद केले जाऊ शकतात किंवा सकाळपासूनच वाहतूक वळवली जाऊ शकते. शनिवारपासूनच राजधानीच्या सीमेवर तपासणी व्यवस्था वाढवण्यात आली होती.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात 27-30 मंत्र्यांचा समावेश अपेक्षित आहे. मोदी सरकार 3.0 मध्ये मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा यावर चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आली आहे. त्यात राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, डॉ. महेश शर्मा, राधामोहन दास अग्रवाल, एस. पी. सिंह बघेल, अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे, पी. सी. मोहन, नारायण राणे, श्रीपाद नाईक, मनसुख मांडविया, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्रसिंह शेखावत, राजीव प्रताप ऊडी, शिवराजसिंग चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, व्ही. डी. शर्मा, वीरेंद्र खाटिक, कुलस्ते, रामवीर सिंग विधुरी, कमलजीत सेहरावत, स्मृती इराणी, मनोहरलाल खट्टर, राव इंद्रजीत, भूपेंद्र यादव, डॉ जितेंद्र सिंग, वैजयंत पांडा, शांतनू ठाकूर, सुरेश गोपी, विप्लव देव, सर्वानंद सोनेवाल, हरदीप पुरी, विजयपाल तोमर, डॉ. भोला सिंग आणि अनूप वाल्मिकी यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.