For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी-ट्रम्प चर्चेने शेअरबाजारात भरला जोश

06:12 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
मोदी ट्रम्प चर्चेने शेअरबाजारात भरला जोश
Advertisement

सेन्सेक्स 449 अंकांनी तेजीत :  स्मॉलकॅप समभाग बहरले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर सुखद दिसून आला. सेन्सेक्स 449 अंकांनी तेजीत राहिला होता. एफएमसीजी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक मजबुतीसोबत बंद झाले होते. गुंतवणूकदारांच्या खात्dयामध्ये 3.5 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

Advertisement

शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 449 अंकांनी वधारत 85267 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 148 अंकांनी वाढत 26047 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 180 अंकाच्या वाढीसह 59389 अंकांवर बंद झाला. स्मॉलकॅप100 निर्देशांक 162 अंकांनी वाढत 17390 रुपयांवर बंद झाला.

निफ्टीत हिंडाल्को, टाटा स्टील, इटर्नल, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील हे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर एचयुएल, सनफार्मा, आयटीसी, मॅक्स हेल्थकेअर, एशियन पेंटस् व पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग घसरणीत होते. मिडकॅप निर्देशांकात हिंदुस्थान झिंक, आयडीबीआय बँक, एनएमडीसी, वोडाफोन आयडिया, जीएमआर एअरपोर्टस्, एनएलसी इंडिया यांचे समभाग तेजीत तर ज्युबिलंट फूड, पीआय इंडस्ट्रिज, आयआरबी इन्फ्रा, सोलार इंडस्ट्रिज, पीबी फिनटेक व भारती हेक्साकॉम यांचे समभाग घसरलेले होते. शुक्रवारी सर्वाधिक खरेदी ही मेटल समभागांमध्ये दिसून आली. तर यासोबत रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑईल अँड गॅस निर्देशांक 1 टक्के वाढत बंद झाले. ऑटो, एनर्जी, फार्मा यांचे निर्देशांकही वधारलेले होते.

गुंतवणूकदारांची चांदी

याचदरम्यान बीएसईवरील सुचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 470.25 लाख कोटींवर पोहचले आहे. जे आधीच्या सत्रात 466.64 लाख कोटी रुपये होते. शुक्रवारी बाजार भांडवल मूल्यात एकंदर 3.61 लाख कोटींची वाढ झाली होती.

Advertisement
Tags :

.