महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशवासियांना मोदी हीच ‘गॅरंटी’

01:20 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भ्रष्टाचारी काँग्रेसला नाकारले, विकासी भाजपला स्वीकारले : भाजप गोव्यासह देशभरातील 400 हून अधिक जागा जिंकणार,भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया

Advertisement

पणजी : राजस्थान, उत्तरप्रदेश, छत्तीसगड व तेलंगण राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने देशातील काँग्रेस हा पक्ष सर्वाधिक भ्रष्टाचार असलेला पक्ष हे दाखवून दिले आहे. देशातील जनतेने या भ्रष्ट काँग्रेसला नाकारून भाजपच्या विकासाला मतदान केले आहे. या निकालाचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात असून, देशातील जनतेला ‘मोदी हीच गॅरंटी’ आहे. सनातन धर्मविरोधी शक्तींना लोकांनी नाकारले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागांसह देशभरातील 400 हून अधिक जागा भाजप जिंकणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. चार राज्यांचे निवडणूक निकाल हाती लागताच मुख्यमंत्री सावंत यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपला पुन्हा एकदा साथ दिल्याने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्याच्या जनतेचे आभार मानले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते.

Advertisement

भाजपच सर्वसामान्यांचा पक्ष

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. परंतु या सत्तेला तेथील जनता विटली होती. कारण काँग्रेसने भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला होता. ज्यावेळी मी प्रचारप्रमुख म्हणून तेथील प्रचारसभांमध्ये भाग घेतला होता, त्यावेळी तेथील जनतेत काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराविषयी उद्रेक होता. भाजपने देशात जी विकासाची गंगा आणली आहे, ती यापूर्वी काँग्रेसने आणलेली नव्हती. केवळ आणि केवळ भ्रष्टाचार आणि कमिशनबाजी यावरच काँग्रेसने लक्ष दिले. त्यामुळेच राजस्थानच्या जनतेने काँग्रेसला नाकारले. चार पैकी तीन राज्यांत भाजपला जनतेने स्पष्ट बहुमत दिल्याने भाजप हाच सर्वसामान्य जनतेचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.

विकास केवळ भाजपलाच शक्य

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेवर राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील जनतेने विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळेच या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले आहे. देशात विकासाला लोक पसंत करीत आहेत आणि हा विकास केवळ आणि केवळ भाजपमुळेच शक्य आहे. विरोधकांनी अनेक बेछूट आरोप करूनही जनतेने भाजपच्या विकासाला साथ दिल्याने पुन्हा एकदा देशात भाजप हाच पर्याय असल्याचे सिद्ध झाल्याचे ते म्हणाले.

लोकसभेची तारीख जाहीर होऊ द्या

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीतील गोव्यातील दोन जिह्यांच्या उमेदवारांबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना विचारले असता ते म्हणाले, “अगोदर लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊ द्या, त्यानंतर उमेदवारही जाहीर करू.” गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही आरामात जिंकणार असल्याचेही ते म्हणाले.

तेलंगणच्या जनतेचेही आभार मानतो...

भाजपने जरी तीन राज्यात स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी तेलगण राज्याच्या जनतेनेही भाजपला साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. तेथील लोकांनी भाजपला दहा जागांवर विजय मिळवून दिलेला आहे. गतवर्षीपेक्षा या ठिकाणी भाजप पक्षाच्या मतांचा टक्काही वाढला आहे. जरी स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी तेथील जनतेने भाजपला दिलेली साथ विसरून चालणार नाही. त्यामुळे तेलंगण जनतेचेही आपण आभार मानतो, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article