For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी हे ‘28 पैसा पंतप्रधान’ उदयनिधी स्टॅलिन यांची टिप्पणी

06:16 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदी हे ‘28 पैसा पंतप्रधान’ उदयनिधी स्टॅलिन यांची टिप्पणी
Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisement

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी यांनी पंतप्रधान मोदींवर राज्य सरकारला निधीवाटप करताना भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. आम्ही आता पंतप्रधान मोदींना ‘28 पैसा पंतप्रधान’ असे संबोधिणार आहोत. तामिळनाडू सरकार केंद्र सरकारला कराच्या स्वरुपात जर 1 रुपये देत असेल तर केंद्र आम्हाला 28 पैसेच परत आहेत. तर भाजपशासित राज्यांमध्ये याहून अधिक प्रमाणात निधी दिला जात असल्याचा दावा उदयनिधी यांनी केला आहे.

स्टॅलिन यांनी केंद्रावर निधीवरून भेदभावाचे आरोप रामनाथपुरम आणि थेनीमध्ये आयोजित सभेत बोलताना केले आहेत. याचबरोबर केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्याच्या मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Advertisement

भाजप पुन्हा सत्तेवर आला तर देशात संघवाद संपुष्टात येणार आहे. राज्यांचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाच. 2024 भारतात लोकशाही राहणार की नाही हे ठरविणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी तंजावुर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले आहे.

जम्मू-काश्मीरकडून राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. तशाचप्रकारे तामिळनाडूकडून राज्याचा दर्जा काढून घेतला जाऊ शकतो. आम्ही जम्मू-काश्मीरची दोन हिस्स्यांमध्ये कशाप्रकारे विभागणी झाली हे पाहिले आहे. राज्याला न विचारता केंद्रशासित प्रदेशात त्याला रुपांतरित करण्यात आले आहे. 5 वर्षांपेक्षा अधिक काळापासून तेथे निवडणूक झालेली नाही, भाजप पुन्हा केंद्रात सत्तेवर आला तर तामिळनाडूतही हीच स्थिती ओढवू शकते असा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.