For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदींनी द्वेषपूर्ण भाषणाने पदाची प्रतिष्ठा कमी केली!

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदींनी द्वेषपूर्ण भाषणाने पदाची प्रतिष्ठा कमी केली
Advertisement

पंजाबमधील मतदानापूर्वी मनमोहन सिंग यांचे पत्र

Advertisement

वृत्तसंस्था /अमृतसर

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुऊवारी (30 मे) पंजाबच्या मतदारांना पत्राच्या माध्यमातून संदेश दिला. तीन पानी पत्रात मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणुकीदरम्यान द्वेषपूर्ण भाषणाचा सर्वात घृणास्पद प्रकार स्वीकारला आहे. इतिहासात आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने समाजातील विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी असे घृणास्पद आणि असंसदीय शब्द उच्चारले नाहीत. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि गांभीर्य कमी करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असल्याचा पत्रोल्लेख मनमोहन सिंग यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने पंजाब, पंजाबी आणि पंजाबियत यांना बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. काही चुकीच्या विधानांसाठी मोदींनी मलाही जबाबदार धरले आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही एका समाजाला दुसऱ्या समाजापासून वेगळे केले नाही. हे करण्याचा कॉपीराइट फक्त भाजपकडे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मी पंजाबच्या सर्व मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन करतो. पंजाबचे प्रगतीशील भवितव्य केवळ काँग्रेसच देऊ शकते, जिथे लोकशाही आणि राज्यघटनेचे रक्षण केले जाईल. आपली राज्यघटना आणि लोकशाहीला निरंकुश सरकारपासून वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, असे सांगताचन माजी पंतप्रधानांनी आपल्या पत्राचा शेवट कवी अल्लामा इक्बाल यांच्या एका प्रसिद्ध शायरीचा हवाला देत केला. ‘फिर उठी आखिर सदा तौहीद की पंजाब से, मर्द-ए-कामिल ने जगाया हिंद को फिर ख्वाब से।’ असा आपल्या पत्राचा समारोप त्यांनी केला आहे.

Advertisement

तरुणांनो, 1 जूनला विक्रम करा! : वाराणसीच्या मतदारांना पंतप्रधान मोदींचा संदेश

वाराणसीतील 2000 विचारवंत आणि महत्त्वाच्या लोकांना पत्र लिहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुऊवारी काशीच्या मतदारांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला. यात त्यांनी माझ्यासाठी काशी ही भक्ती, शक्ती आणि त्यागाची नगरी आहे. काशी ही जगाची सांस्कृतिक राजधानी, संगीताची भूमी आहे. काशीच्या मतदारांनी 1 जूनला विक्रम करावा, असे मोदी म्हणाले. प्रत्येक बूथवर तऊणाईचा उत्साह दिसून आला पाहिजे. नवविकसित भारताची ही निवडणूक असल्याचे मोदी म्हणाले.

Advertisement
Tags :

.