कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रामजीनगरमधील आधुनिक वाल्या कोळी!

11:34 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारच्या काचा फोडून चोऱ्या : पुनर्वसनानंतरही पुन्हा चोरी करण्याकडे कल

Advertisement

बेळगाव : चोरीच्या कमाईतून गावजेवण घालणाऱ्या तेलंगणामधील शिवप्रसाद ऊर्फ मंत्री शंकर (वय 56) याचे कारनामे तेलंगणा, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रासह आता कर्नाटकातही माहितीचे झाले आहेत. आता माळमारुती पोलिसांनी एक महिन्यापूर्वी तामिळनाडूत अटक केलेल्या 20 वर्षीय तरुणामुळे रामजीनगरमधील गुन्हेगारांच्या रुढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धांवर प्रकाश पडला आहे. दीनदयाळन ऊर्फ दीन जयशिलन (वय 20) राहणार मिल कॉलनी, रामजीनगर, ता. श्रीरंगम, जि. त्रिची, तामिळनाडू याला एक महिन्यापूर्वी माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. कारच्या काचा फोडून कारमधील ऐवज पळविण्यात दीनदयाळनचा हातखंडा आहे. या गुन्ह्यात तो एकटाच नाही तर त्याचे वडील जयशिलन यांचाही सहभाग आहे.

Advertisement

एका वैद्यकीय विद्यार्थ्याच्या कारची काच फोडून कारमधील लॅपटॉप व इतर साहित्य चोरण्यात आले होते. कारच्या काचा फोडून रक्कम, दागिने, लॅपटॉप, कॅमेरे व इतर वस्तू चोरण्याचे अनेक प्रकार बेळगावात घडले आहेत. पंधरवड्यापूर्वी धर्मवीर संभाजी चौक परिसरात कारची काच फोडून रोकड पळविण्यात आली होती. मात्र, अशा बहुतेक गुन्ह्यांमागे रामजीनगरचे गुन्हेगार सक्रिय असतात. दीनदयाळनच्या ताब्यातून अॅपल कंपनीचे दोन लॅपटॉप, अॅपल कंपनीचे दोन आयपॅड, एक ऑटोस्कोप असा एकूण सुमारे 4 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी रामजीनगरच्या गुन्हेगारांविषयी माहिती जमविण्याचे काम हाती घेतले असता गुन्हेगारांच्या रुढी, परंपरा, एखादा गुन्हा करण्याआधी ते काय करतात? आदी गोष्टींची माहिती मिळाली.

एखादा गुन्हा करण्याआधी ते आपल्या पूर्वजांची पूजा करतात. नमस्कार करून त्यांना नैवेद्यही दाखवतात. रामजीनगरमध्ये ते नेहमी साळसुदासारखे वावरतात. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्हेगारांची माहिती जमवली आहे. बहुतेक गुन्हेगार कारच्या काचा फोडून कारमधील किमती ऐवज पळविण्यात तरबेज आहेत. लहानपणापासूनच त्यांना गुन्हेगारीचे धडे मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात चोर-दरोडेखोरांचे रामजीनगरमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. यापैकी अनेक कुटुंबे पुन्हा चोरी करण्याकडे वळली आहेत. या गावात सुमारे साडेसहाशेहून अधिक घरे आहेत. रामजीनगरमधील गुन्हेगारांचा बेळगाव, बेंगळूर, मुंबई, कोलकातासह देशभरातील विविध महानगरात संचार असतो. या प्रकरणातील दीनदयाळनला अटक झाली आहे. त्याचे वडील अद्याप फरारी आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article