कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बंदर, दाबोळी, वास्को, पणजीत आज मॉक ड्रिल

01:06 PM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळळी आहे. भारत व पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने देशात विविध ठिकाणी ‘मॉक ड्रील’ची तयारी केली असून त्यात गोव्यातही आज बुधवारी 7 चार ठिकाणी युद्धाची ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुरगाव बंदर, दाबोळी, वास्को व पणजी येथे ही मॉक ड्रिल होणार असून, जनतेने पूर्णपणे सहकार्य करावे. एनसीसी, एनएसएस, गृह रक्षक दल, आपदा मित्र यांनी आपत्कालीन स्थितीत कशा प्रकारे काम करणे आवश्यक आहे, यासाठीची ही तयारी आहे. आज मॉक ड्रिल संबंधी गृह सचिवांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली. या बैठकीला मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, गृह सचिव व जिल्हाधिकारी उपस्थित होते. रेडिओ, दूरदर्शनद्वारे सूचना तसेच संदेश दिले जातील. या सूचनांचे पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलत आहेत, त्याना पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article