For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवारमध्ये आज मॉक ड्रिलचे आयोजन

10:57 AM May 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
कारवारमध्ये आज मॉक ड्रिलचे आयोजन
Advertisement

ब्लॅकआऊट संदर्भात कारवार जिल्हा पोलिसांकडून नियमावली जाहीर

Advertisement

कारवार : मॉक ड्रिल अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या ब्लॅकआऊटचा अनुभव कारवार तालुकावासिय सोमवार दि. 12 रोजी घेणार आहेत. रात्री 7.30 ते 8 वाजेपर्यंत कारवार नगरपालिका लिमीट आणि कैगा अणुऊर्जा प्रकल्पाच्या टाऊनशीप (मल्लापूर) येथे ब्लॅकआऊटचे आयोजन करण्यात आले आहे. ब्लॅकआऊट संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कारवार जिल्हा पोलिसांनी असे म्हटले आहे की, हवाई हल्ल्याचा इशारा सायरनद्वारे नागरिकांना देण्यात येईल. त्यानंतर नागरिकांनी आपल्या घरातील खिडक्या बंद करुन पडद्यांनी खिडक्या झाकल्या पाहिजेत. खिडक्या काळसर वस्तूंनी झाकल्या पाहिजेत किंवा गरज भासल्यास काळा रंग वापरला पाहिजे.

नागरिकांनी आपल्या आसपास उजेड देणारे दिवे, पथदीप बंद केले पाहिजेत. घरात आवश्यक असलेला उजेड मंद केला पाहिजे. घराबाहेर उजेड जाणारे दरवाजे, खिडक्या आदी संपूर्णपणे बंद केले पाहिजेत, असे पुढे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी 4 वाजता बिणगा येथील ग्रासीम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये इमारत कोसळल्यानंतर हाती घेण्यात येणाऱ्या बचाव ऑपरेशन संदर्भात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 5 वाजता कदंबानेवल बेसच्या अमदळ्ळी सिव्हीलियन कॉलनीमध्ये फायर ड्रीलचे आयोजन केले आहे. संध्याकाळी 6 वाजता रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे बीच इवॅक्युएशन मॉक  ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

एक हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

कारवार तालुक्यातील वेगवेगळ्या 6 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मॉक ड्रिलच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सुमारे 1 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान आज हाती घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलबद्दल विशेष करुन ब्लॅकआऊटबद्दल कारवार जिल्हावासियांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

Advertisement
Tags :

.