कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारवारमध्ये १२ मे रोजी मॉक ड्रिल

10:55 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवारच्या जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांची माहिती : वेगवेगळ्या सहा ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन : 40 कर्मचाऱ्यांचे नियोजन

Advertisement

कारवार : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची केलेल्या व्रुर हत्येच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान दरम्यानचे युद्धाचे वारे वाहू लागले आहेत. पाकिस्तानी वायू हल्ला किंवा अन्य हल्ल्याच्या कक्षेत कारवार जिल्ह्यातील काही भाग येऊ शकतात. सर्वसामान्य जनतेला कोणत्याही परिस्थितीशी संपर्क करण्याचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने 12 मे रोजी कारवार तालुक्यात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कारवारच्या जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी दिली. त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या.

Advertisement

त्या म्हणाल्या, राज्यातील बेंगळूर, रायचूरबरोबरीने 7 मे रोजीच कारवारतही मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, त्या दिवशी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले नाही, असे स्पष्ट करुन लक्ष्मीप्रिया यांनी कारवारपासून 55 ते 60 कि.मी. अंतरावर कैगा येथे कर्नाटकातील एकमेव अणू ऊर्जा प्रकल्प कार्यरत (प्रत्येकी 220 मेगा वॅट क्षमतेच्या चार अणुभट्ट्या) असल्याने आणि कारवार जिल्ह्याला सुमारे 140 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभल्याने सरकारने कारवारचा समावेश द्वितीय कॅटगरीमध्ये करण्यात आला आहे. के. लक्ष्मीप्रिया वेगवेगळ्या सहा ठिकाणी मॉक ड्रिलबद्दल अधिक माहिती देताना म्हणाल्या, 12 मे रोजी कारवार तालुक्यातील वेगवेगळ्या सहा ठिकाणी वेगवेगळ्या सहा ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दिवशी दुपारी 4 वाजता येथून जवळच्या ग्रासीम इंडस्ट्रीजच्या परिसरात इमारत कोसळली तर नागरिकांचे रक्षण कसे करायचे, जखमींना रुग्णालयात कसे दाखल करायचे या बद्दल सराव करण्यात येणार आहे. यासाठी 40 कर्मचाऱ्यांचे नियोजन केले आहे.

दुपारी 4 वाजता कैगा येथे अग्निशमन दलाच्या सहकार्याने सरावाचे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता अमदळ्ळी येथील सिलीलीयन कॉलनीमध्ये आगीपासून 40 नागरिकांचे रक्षण करण्यासाठी सरावाचे आयोजन केले आहे. यासाठी बैतखोल येथे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात येणार आहे. डॅमवर हल्ला झाल्यास अडचणीत आलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हरतुगा येथे 6 वाजता सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. हरतुगा येथे अडचणीत आलेल्या नागरिकांची व्यवस्था सिद्दर येथील शाळेत करण्यात आली आहे. येथील रविंद्रनाथ समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेले नागरिक अडचणीत आल्यास त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी 6 वा. प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी कोस्टल पोलीस पर्यटन खात्याकडून मदत घेण्यात येणार आहे.

कारवारनगर-कैगा टाऊनशिपमध्ये ब्लॅक आऊट

12 मे रोजी 7.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत कैगा अणु उर्जा प्रकल्पाच्या टाऊनशिपमध्ये आणि कारवार शहर प्रदेशात ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे. यावेळी सायरन वाजवण्यात येईल. त्यावेळी नागरिकांनी घरातील वीजपुरवठा बंद करायचा आहे, असे पुढे लक्ष्मीप्रिया यांनी सांगितले. यावेळी कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एम. नारायण उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article