For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईलवाला...

06:14 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोबाईलवाला
Advertisement

विदेशातील एक कथा मुरलीवाला या नावाने त्यावेळी वाचनमालेमध्ये सुरू केली होती. गावामध्ये कोणतेही प्रश्न उद्भवला तर तो स्वत: सोडवायचा असतो हे लक्षात न घेता बाहेरचा माणूस बोलवून हा प्रश्न सोडवण्याकडे सगळ्यांचाच कल असतो.  गावात खूप उंदीर झाल्याने त्यावर उपाय करण्यासाठी एक मुरलीवाला आणून सगळे उंदीर गावाबाहेर घालवले जातात. या कामाचा मोबदला म्हणून जे पैसे द्यायचे ठरले असतात ते पैसे न दिल्याने हा मुरलीवाला गावातल्या मुलांना देखील लांब पळवून नेतो. ही जरी काल्पनिक कथा असली तरीही आज कलियुगामध्ये असा मुरलीवाला मोबाईलच्या रूपात सगळ्याच लहान, थोरांना त्याच्यामागे खिळवून ठेवतो. त्याची ही कथा.......

Advertisement

मोबाईलवाला.....

आमच्या लहानपणी मुरलीवाला नावाची एक गोष्ट नेहमी सांगितली जायची. गावात घरात सर्वत्र उंदीर खूप झाले म्हणून जादूची मुरली वाजवणारा एक माणूस जादूगार शोधून आणला गेला. त्याची मुरली ऐकून सगळे उंदीर त्याच्यामागे जायला लागले पण गंमत अशी झाली त्यासाठी त्या जादूगाराला काही पैसे द्यायचे ठरले होते. ते न दिल्यामुळे जादूगार रागावला आणि तो मग गावातल्या मुलांना आपल्या बासरीच्या स्वरांनी जादू करून आपल्या मागे घेऊन गेला. ही कथा वाचल्यानंतर आजच्या कलियुगात नेमकं काय घडलं असतं हा विचार केला आणि ही कथा लिहायला घेतली......

Advertisement

जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी माणसं खूप शिकू लागली शिकून खूप हुशार झाली, नोकऱ्या धंदे करू लागली...  संसार करायला वेळच मिळेना त्यातच जन्माला आलेलं एकुलते एक पोर डोक्याला नुसता ताप झाला अभ्यास घेता घेता  मुलांची करिअर अडचणीत येऊ लागली..काय करावं? कुणाला सांगावं? विचार सुरू झाला हवा तेवढा खर्च करायचा, परदेशातून माल आयात करायचा  अमेरिकेतून एक मोबाईलवाला आला तो म्हणाला मी तुमची पोरं सांभाळीन त्यांना खूप शिकवीन जगसुद्धा दाखवीन, विरंगुळा देईन  मी म्हणजे कल्पवृक्ष, मी म्हणजे कामधेनु मागाल ते मिळेल न मागितलेले सुद्धा मिळेल

सगळ्यांनाच हा मोबाईलवाला खूप आवडला. प्रत्येकाने त्या मोबाईलवाल्याकडून पैसे देऊन मोबाईल घेतला. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागले. लहान मुलं, तरणी-ताठी म्हातारे कोतारे सगळेजण या मोबाईलच्या नादी लागले. त्याच्यामुळे काही प्रश्न जरी मिटले तरी प्रचंड प्रश्न तयार झाले. समस्या सुरू झाल्या.

सर्वजण 24 तास या मोबाईलच्या मागे लागले. दिवस नाही, रात्र नाही, खाणं नाही, पिणं नाही.. तहानभूक विसरून मोबाईलमध्ये बघत बसले. हा मोबाईल......शिकवायचा, हसवायचा, रडवायचा, पदार्थ मागवून द्यायचा, मुलं वाटेल तेव्हा, वाटेल ते खाऊ लागले. मोबाईलमधून मुलं सगळं जगभर फिरू लागले.

डॉक्टरांचे सल्ले, बँकेवर डल्ले मारू लागले. मुलींची छेड काढू लागले. अगदी चक्क गुन्हेगार झाले. आता मात्र प्रश्न पडला, मनावर ताण निर्माण झाला. म्हाताऱ्यांचा आजार वाढला.  मोबाईल बंद पडेना आणि यातून सुटका होईना.

मोबाईलमुळे घरबसल्या सगळं जग घरात आलं. आभासी जगाचे राजे झालो.  नाती संपली, प्रेमसुद्धा खोटं ठरलं. वर्क फ्रॉम होम, बंद खोलीत ऑफीस थाटलं. खरेदी विक्री, जेवणखाण, सगळंच ऑनलाईन चोरांनासुद्धा हेच बरं वाटलं.. मैदान सुटलं, व्यायाम संपला, ताजं अन्न कायमचं संपलं..... कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी काही कष्ट करायचे असतात, हेच विसरून गेलो. हे सगळं करणारा गायब झाला होता. मोबाईलमधून प्राण आमचे घेऊन गेला होता.

Advertisement
Tags :

.