कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आधारवरील मोबाईल नंबर घरबसल्या बदलता येणार

06:28 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्मार्टफोनवर नवे अॅप इन्स्टॉल करावे लागणार :  ओटीपी आणि फेस आयडेंफिकेशनद्वारे सुविधा मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आधार कार्डवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आता आधार केंद्रे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचा त्रास होणार नाही. आधार कार्डधारक आता घरबसल्या आपले मोबाईल नंबर अपडेट करू शकतील. वापरकर्ते आधार अॅपवर ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करू शकतील. ‘युआयडीएआय’ने ‘एक्स’ लॅटफॉर्मवर पोस्ट करत या सुविधेसंबंधी माहिती दिली. ही सेवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

अलीकडेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) नवीन आधार अॅप लाँच केले आहे. हे अॅप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल केल्यानंतर आधार कार्डवर नोंदणीकृत मोबाईल नंबर सहजपणे बदलण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. नवीन आधार अॅपवर सूचीबद्ध केलेल्या तपशीलांमध्ये प्रक्रिया वेळ, शुल्क आणि इतर अटी स्पष्ट केल्या आहेत. नवीन आधार अॅप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर इन्स्टॉल करता येतो. त्यानंतर, आपल्या आधार कार्डच्या तपशीलांसह अॅपमध्ये लॉग इन करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा असून त्यामध्ये 130 कोटीहून अधिक लोकांचा डेटा समाविष्ट आहे. या माहितीमध्ये मोबाईल नंबर हा कार्डचा एक महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही आधारकार्डधारकाचा मोबाईल क्रमांक त्याची बँक खाती, सरकारी अनुदाने, प्राप्तिकर पडताळणी आणि डिजीलॉकर सारख्या डिजिटल सेवांमध्ये ओटीपीद्वारे प्रवेश प्रदान करतो. जर नंबर जुना झाला किंवा हरवला तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पूर्वी आधारकार्ड अपडेट करण्यासाठी नावनोंदणी केंद्रात जावे लागत असे. यादरम्यान बायोमेट्रिक पडताळणीचा त्रास, सर्व्हर डाऊन आणि लांब रांगा लागल्यामुळे लोकांना तासनतास ताटकळत थांबावे लागत होते. तथापि, युआयडीएआय आता ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सोपी करत आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article