आमदारांकडून बसवन कुडची शाळेच्या विकासकामांची पाहणी
10:47 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : आमदार असिफ सेठ यांनी नुकतीच बसवन कुडची येथील शाळेला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेतली. शाळेच्या परिसरात नवीन वर्गखोल्या बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम उत्तम दर्जाचे व्हावे, अशा सूचना त्यांनी शिक्षक तसेच कंत्राटदाराला केल्या. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून लवकरात लवकर सुसज्ज वर्गखोल्या बांधून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. यावेळी युवा नेते अमन सेठ, नगरसेवक बसवराज मोदगेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक व बसवन कुडची येथील नागरिक उपस्थित होते.
Advertisement
Advertisement