For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार सूरज रेवण्णाला अटक

06:50 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमदार सूरज रेवण्णाला अटक
Advertisement

अनैसर्गिक लैंगिक शोषणाचा आरोप : रविवारी पहाटे पर्यंत चौकशीनंतर हासनच्या सायबर क्राईम पोलिसांची कारवाई

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

अनैसर्गिक लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा विधानपरिषद सदस्य सूरज रेवण्णा याला अटक केली आहे. शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात नेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. लैंगिक शोषण प्रकरणात माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांची चौकशी सुरू असतानाच त्यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य सूरज रेवण्णाला अटक करण्यात आली आहे.  हासनच्या सायबर क्राईम पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

सूरज रेवण्णाने आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत अरकलगुडू येथील एका निजद कार्यकर्त्याने होळेनरसिपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या कार्यालयातही तक्रार दाखल केलेल्या पीडित तरुणाने तक्रारीची प्रत हासनच्या पोलीसप्रमुखांनी पाठविली. तक्रारीच्या आधारे होळेनरसिपूर ग्रामीण पोलीस स्थानकात कलम 377 (अनैसर्गिक गुन्हा), 342 (खोट्या अटकेसाठी शिक्षा) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, फिर्यादीवर ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत तक्रार देण्यासाठी सूरज रेवण्णा शनिवारी सायंकाळी हासनच्या सायबर क्राईम पोलीस स्थानकात पोहोचला होता. दरम्यान, पोलिसांनी रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सूरज रेवण्णाची चौकशी केली. चौकशीनंतर सूरज रेवण्णाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने सकलेशपूर डीवायएसपींची नियुक्ती केली असून तपासानंतर सूरज रेवण्णाला चौकशी अधिकारी प्रमोद कुमार यांनी अटक केली.

काय आहे प्रकरण

पीडित निजदचा कार्यकर्ता असून तो डॉ. सूरज रेवण्णा यांच्या ओळखीचा होता. 16 जून रोजी सूरज यांच्या गन्निकडा फार्महाऊसवर नोकरी विचारण्यासाठी गेला असता सूरजने त्याचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, सूरज रेवण्णा याचा जवळचा मित्र हनुमानहळ्ळी येथील शिवकुमार याने शुक्रवारी होळेनरसिपूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराविऊद्ध उलट फिर्याद दाखल केली होती. तक्रारदार 16 जून रोजी सूरज याच्याकडे नोकरी विचारण्यासाठी आला होता. त्यानंतर तुम्ही तुमच्या नेत्याकडून काम देऊ शकत नाही. मी खूप अडचणीत असून मला 5 कोटी रुपये देण्याची मागणी तक्रारदारने केली होती. तसेच पैसे न दिल्यास आमदाराविऊद्ध अनैसर्गिक लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याचे शिवकुमार यांनी तक्रारीत म्हटले होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सूरजने स्वत: हासनच्या सायबर क्राईम पोलीस स्थानक गाठून फिर्यादीविरोधात उलट तक्रार दाखल केली आहे.

खटला लोकप्रतिनिधी न्यायालयात वर्ग होण्याची शक्यता

सूरज रेवण्णाविऊद्ध आयपीसी कलम 377, 342, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून खटला बेंगळूर येथील लोकप्रतिनिधी न्यायालयात वर्ग केला जाण्याची शक्मयता आहे. सूरज हा विधानपरिषदेचे सदस्य असल्याने या प्रकरणाची सुनावणी लोकप्रतिनिधी न्यायालयात होण्याची शक्मयता आहे. होळेनरसिपूर ग्रामीण स्थानकात नोंदविलेला एफआयआरही हस्तांतरित होणार आहे. प्रकरण वर्ग झाल्यास सूरजला बेंगळूरला घेऊन जाण्याची शक्मयता आहे. या प्रकरणाच्या हस्तांतरणाबाबत पोलीस कायदेतज्ञांशी सल्लामसलत करत आहेत.

पीडित तरुणाची वैद्यकीय तपासणी

सूरज रेवण्णावर अनैसर्गिक लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली फिर्याद दिलेल्या पीडित तऊणाची रविवारी शहरातील बोरिंग ऊग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच पीडित तरुणाला हासन येथून बोरिंग ऊग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी केली आहे. हासन येथे वैद्यकीय तपासणीला नाकारणाऱ्या तरुणाच्या मागणीवरून बोरिंग ऊग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी होळेनरसिपूर पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.

प्रकरण सीआयडीकडे वर्ग

डॉ. सूरज रेवण्णा याच्यावरील अनैसर्गिक लैंगिक शोषण आरोपाचे प्रकरण  सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) हितेंद्र यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. एडीजीपी हितेंद्र यांनी सूरज रेवण्णा याच्याविऊद्धचे प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित केल्याचे हासन एसपी, सीआयडी डीजीपींना पत्र लिहिले आहे. स्वत: सीआयडी कार्यालयात जाऊन प्रकरणाची फाईल देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. तसेच सीआयडी अधिकाऱ्यांना तपासाची तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

डॉ. लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सूरज रेवण्णाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, होलेनरसीपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक पोलिसांनी केलेला तपास अहवाल सीआयडी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला नाही. त्यामुळे सीआयडीने अधिकृतपणे तपास हाती घेतला नाही.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अनैसर्गिक लैंगिक शोषण आरोपप्रकरणी विधानपरिषद सदस्य सूरज रेवण्णा याना लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. होळेनरसिपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिसांनी केलेला तपास अहवाल अद्याप सीआयडी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला नाही. त्यामुळे सीआयडीने अधिकृतपणे तपास हाती घेतलेला नाही.

Advertisement
Tags :

.