आमदार सेठ यांच्याकडून कोसळलेल्या घराची पाहणी
11:27 AM Jul 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगावमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी काकतीवेस येथील घर कोसळले होते. रविवारी बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ यांनी घराची पाहणी करून कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. काकतीवेस येथील हरळय्या समाजाच्या गल्लीतील प्रतिभा मंजुनाथ कांबळे यांचे घर शुक्रवारी मुसळधार पावसामुळे कोसळले. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून कांबळे कुटुंबीयांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी कुटुंबीयांनी सरकारकडे केली होती. रविवारी आमदारांनी घटनास्थळी पोहोचत घराची पाहणी केली. त्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी आपण सरकारदरबारी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
Advertisement
Advertisement