For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अजिंक्यतारा’वर येवूनच घरी जात होता विसरु नका! आमदार सतेज पाटील यांचे खासदार मंडलिक यांना प्रत्यूत्तर

04:53 PM Apr 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
‘अजिंक्यतारा’वर येवूनच घरी जात होता विसरु नका  आमदार सतेज पाटील यांचे खासदार मंडलिक यांना प्रत्यूत्तर
Advertisement

मिरजकर तिकटी प्रचार सभा : रेकॉर्डब्रेक मताधिक्याने शाहू छत्रपतींना विजयी करण्याचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी

2019च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत का आलो, अशी विचारणा करणारे त्यावेळी दिवसभरातील प्रचारनंतर रात्रीचे कितीही वाजले तरी आजिंक्यताराची पायरी चढल्याशिवाय घरी जात नव्हते हे त्यांनी विसरु नये, असे प्रत्युत्तर आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना केले. तसेच विचारांच्या या लढाईत श्रीमंत शाहू छत्रपती यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी करुया, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

Advertisement

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ रविवारी मिरजकर तिकटी येथे प्रचार सभा झाली. यावेळी आमदार पाटील बोलत होते. सभेला श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा श्रीमंत शाहू छत्रपती पुढे घेवून जात आहेत. हा वारसा आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे. विरोधकांनी श्रीमंत शाहू छत्रपतींवर न बोलण्याचे जाहीर केले. पण आता वैयक्तिक पातळीवर टिका सुरु आहे. विरोधकांनी बोलताना संयम पाळावा, अन्यथा कोल्हापूरची जनता त्यांना जशास तसे उत्तर देईल. विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्या खासदारांना उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यांच्या दिल्लीतील नेतृत्त्वाकडून कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याचा विचार सुरु होता. यावरुन विद्यमान खासदार यांना जनमत नसल्याचे स्पष्ट होत असून ते निष्क्रीय खासदार असल्याची टिका आमदार पाटील यांनी केली.

श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, देशात लोकशाही पाहिजे का हुकुमशाही हे ठरवणारी हि निवडणुक आहे. गेल्या 65 वर्षात देशाचा विकास झाला नाही मात्र दहा वर्षात देशाचा मोठ्याप्रमाणात विकास झाला हे खोट आहे. काँग्रेस सरकारच्या काळात खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाचा पाया रचला गेल्याचे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितले.

Advertisement

आमदार जयश्री जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कोल्हापूरवर अनंत असे उपकार आहेत. या उपकारांची परतफेड करण्याची छोटीशी संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे श्रीमंत शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करुया, असे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, हर्षल सुर्वे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, माजी नगरसेवक राजेश लाटकर, वंचितचे दयानंद कांबळे, आशोक पवार, भारती पोवार आदींची भाषणे झाले. सभेला महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.