राजर्षी शाहूंच्या विचारावर आमदार ऋतुराज पाटील यांची वाटचाल : मधुरिमाराजे छत्रपती
कोल्हापूर :
सामान्याची मुले शिकावीत, जीवनात यशस्वी व्हावीत व त्या माध्यमातून सक्षम पिढी घडावी हा राजर्षी शाहू महाराजांचा विचार आमदार ऋतुराज पाटील आपल्या कामातून पुढे घेऊन जात आहेत असे गौरवोद्गार मधुरिमाराजे छत्रपती यांनी काढले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ क्रशर चौक येथील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिणमध्ये मोठी विकासकामे केली आहेत. सर्वांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. आमदार पाटील यांनी सरनोबतवाडीच्या निरंजन शिंदे या मुलाला आर्थिक मदत देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. आज तो स्वत:च्या पायावर चालत आहे. उचगाव मणेरमळा मधील जिल्हा परिषदेची शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित केली असून सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचा विकास साधणारे नेतृत्व असलेले आमदार ऋतुराज पाटील यांना मताधिक्याने निवडून आणूया.
आ.सतेज पाटील म्हणाले, आपला आमदार सुसंस्कृत आहे, तो प्रत्येकाशी नम्रपणे वागतो आणि जनतेची कामेही ताकदीने करतो. प्रत्येकाला अभिमान वाटावा असा आमदार आपल्याला लाभला आहे. दक्षिणच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनाच विजयी करा.
माजी नगरसेवक शारंगधर देशमुख म्हणाले, कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उपनगरांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मंजूर केलेला 60 कोटीचा निधी अन्यत्र वळवण्याचे पाप महाडिकांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या विकासकामांमध्ये अडथळे आणणा-या महाडिकांना कायमचे घरी बसवा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तानाजी इंगळे यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. यासह एस टी महामंडळ कर्मचारी संघटना, पुईखडी ऑक्सिजन पार्क कार्यकर्ते आणि शामराव गवळी यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक भरत लोखंडे, अभिजीत चव्हाण, संजय सावंत, माजी नगरसेविका संगीता सावंत, प्रसन्न पडवळे, सुयोग मगदूम, सुनील देसाई, सदानंद कवडे, प्राध्यापक टी. एस. पाटील, उदय गायकवाड, कुलदीप सावतकर, प्राध्यापक जे. के. पवार, गुरुप्रसाद जोशी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भागातील नागरिक उपस्थित होते.