आमदार राजू सेठ यांची सेवा सर्वांसाठी प्रेरणादायी
मैनुद्दीन मुल्ला यांचे प्रतिपादन : आमदार सेठ यांचा वाढदिवस उत्साहात
बेळगाव : कोणतीही सत्ता किंवा पद नसतानाही सामाजिक भावनेतून आजपर्यंत राजू सेठ यांनी जे कार्य केले त्याला तोड नाही. कोरोना काळात बेळगाव शहरासह जिह्याने त्यांची नि:स्वार्थी सेवा पाहिली. त्याचीच पोहोच म्हणून तसेच सेठ घराण्याने गेल्या चार-पाच दशकात शहरासाठी दिलेले योगदान लक्षात ठेवून विधानसभा निवडणुकीत त्यांना आमदारकीची माळ बेळगाव उत्तर मतदारसंघातील जनतेने घातली. आमदार राजू सेठ यांची सेवा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मैनुद्दीन मुल्ला यांनी केले.
बेळगाव येथे जिल्हा अंजुमन कमिटी अध्यक्ष व बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त निपाणीतील सेठप्रेमी आणि मुस्लीम समाजातर्फे आमदार सेठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार राजू सेठ यांचा शाल, हार आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार फिरोज सेठ, युवा नेते अमन सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सेठ यांनी बेळगाव शहराबरोबरच जिह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. निपाणीतील अनेक वर्षांपासून रखडलेला अंजुमन शादी महलचा प्रश्न मार्गी लावल्याचे मुल्ला यांनी सांगितले. याप्रसंगी हादी मुल्ला, शेरगुलखान पठाण, बख्तीयार कोल्हापुरे, विकास चव्हाण, नजीर कोचरगी, बाळू अत्तार, अमर बोरगावे, यांच्यासह कार्यकर्ते, सेठप्रेमी नागरिक उपस्थित होते.