महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आगीत बेचिराख झालेल्या दुकानांची आ. नितेश राणे यांनी केली पाहणी

10:36 AM Nov 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दुकान मालकांची केली विचारपूस

Advertisement

कणकवली /प्रतिनिधी
शहरातील पटवर्धन चौक येथे असलेल्या आर.बी. बेकर्स, राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडीकलला शुक्रवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सर्व दुकाने बेचिराख झाली. या घटनेची माहिती मिळताच आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकान मालकांची विचारपूस केली. आपण घाबरून जाऊ नका, मी आपल्या पाठीशी आहे. आपण सर्वतोपरी लागणारी मदत करु , पुढील काळात अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाईल, असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले.यावेळी माजी नगराध्यक्ष समीर गावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक,भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राजू गवाणकर, बेकरी मालक राजू, बर्डे मेडीकलचे मालक सौरभ बर्डे, राजा पाटकर, जावेद शेख, अनिल पवार लवराज झेमने, विराज भोसले,अजय गांगण ,अभय राणे, इम्रान शेख आदींसह कणकवली शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
घटनास्थळाच्या पाहणीनंतर श्री. राणे म्हणाले, ऐन दिवाळीच्या काळात या दुकानांना शॉर्टसर्किटमध्ये आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात दुकानदारांचे नुकसान झालेले आहे. घटनास्थळी सकाळपासून आमचे समीर नलावडे, बंडू हर्णे, अबिद नाईक आणि आम्ही सर्व लागणाऱ्या गोष्टींची मदत केली आहे. भविष्यात अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत म्हणून ज्या काय आवश्यक असलेल्या उपाययोजना त्यांनी निश्चितपणे केल्या जातील. त्या दुकानदारांची फार मोठी ऐन दिवाळीच्या काळात हानी झाली आहे, त्याचे दुःख होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg# news update # konkan update # marathi news # news update # kankavli
Next Article