For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार निलेश राणेंकडून जखमी रिक्षा चालकास मदतीचा हात

04:15 PM Jul 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आमदार निलेश राणेंकडून जखमी रिक्षा चालकास मदतीचा हात
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

नारिंग्रे येथे झालेल्या एसटी बस व रिक्षा अपघातात आचरा गावातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच या अपघातात रिक्षा व्यावसायिक रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा - बांबुळी येथे उपचार चालू होते. गोवा बांबुळी येथील उपचारानंतर ते सुखरूप घरी परतले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जखमी बिनसाळे यांच्या घरी जात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी दिलेली आर्थिक मदत बिनसाळे यांना सुपूर्द केली आहे.यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा उपाध्यक्ष महेश राणे, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, अभिजित सावंत, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, विजय कदम, चंदू कदम, अभय भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते. काही दिवसापूर्वीच आमदार निलेश राणे यांनी अपघातातील मृतांच्या कुटूंबीयांची भेट घेत आर्थिक मदतीचा हात दिला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.