आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकरांवर आमदार लिंगाडे यांनी दाखल केला हक्कभंग
बुलढाण्याच्या टक्कल व्हायरसवरून दिशाभूल
मुंबई
आज अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनात अनेकदा विरोधक सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडतात तर औरंगजेबाच्या कबरीवरून हे अधिवेशन चांगलेच गाजले. यातच भाजपाच्या राज्यमंत्री अडचणीत आल्याचे दिसून आले. दरम्यान आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात कॉंग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग दाखल केला आहे. बुलढाण्याच्या केस गळती प्रकरणाबद्दल चुकीची माहिती दिल्यावरून हक्कभंग दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाण्यात लोकांना टक्कल पडण्याच्या विषयी विधान परिषदेत खोटी माहिती दिल्याप्रकरणी हक्कभंग दाखल करण्यात आला.
विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी हा हक्कभंग दाखल करून घेतल्याचीही माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होत असल्याचेही दिसत आहे. बुलढाण्याती लोकांची केस गळती होत आहे, टक्कल पडत आहे, या प्रकरणावर शासानाने पथकाने पाहणी केली. याविषयी डॉ. हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले होते.
काय आहे नेमकं प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी बुलढाण्याती लोकांना अचानक टक्कल पडत असल्याची चर्चा होत मोठी खळबळ निर्माण झाली होती. लोकांमध्ये केस गळतीचे प्रमाण इतके वाढले होते की, त्यांना डोक्याला टक्कल पडत होते. या दरम्यान रेशनवर मिळाणाऱ्या गव्हामधील सेलेनियममुळे लोकांचे केस गळत असल्याचे संशोधन पद्मश्री डॉ. हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले आहे. मात्र, मंत्री मेघना बोर्डीकर यांनी गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी माहिती सभागृहाला दिली. सभागृहाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे कॉंग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी हक्कभंग दाखल केला आहे.