महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले! 2 युवक ठार

03:30 PM Aug 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
MLA Jayakumar Gore convoy
Advertisement

बिदाल- शेरेवाडीवर शोककळा

सातारा : प्रतिनिधी

आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बिदाल-शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

याबाबतची अधिक माहिती अशी, आज आमदार जयकुमार गोरे यांचा जनसंवाद दौरा सुरु आहे. या दौर्‍यात त्यांच्यासोबत तीन ते चार वाहनांचा ताफा असतो. आज सकाळी आमदार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती. याच सुमारास बिदाल व दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनिकेत नितीन मगर (वय : २६ वर्षे) व रणजीत राजेंद्र मगर (वय : ३२ वर्षे) हे आपल्या दुचाकीवरुन बिदालकडे जाण्यास निघाले.

Advertisement

ही दुचाकी शेरेवाडीमधून बिदालला जाण्यासाठी रस्त्यावर आली असता आमदार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने या दुचाकीला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीसह दुचाकीस्वार हवेत उडाले. यात दुचाकीचा चक्काचूर झाला तर दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. तसेच स्कॉर्पिओ रस्ता सोडून बाजूला गेली. यात स्कॉर्पिओचे सुध्दा मोठे नुकसान झाले.

गंभीर दुचाकीस्वारांना तत्काळ दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Advertisement
Tags :
2 youths killedconvoy blown upMLA Jayakumar Gore
Next Article