महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार डॉ.गणेश गावकर यांना मंत्रीपद द्यावे

01:23 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सावर्डे मतदारसंघातील सातही पंचायतींची मागणी : विकासासाठी संधी देण्याची गरज

Advertisement

धारबांदोडा : सावर्डे मतदारसंघाचे आमदार डॉ. गणेश गांवकर यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा अशी मागणी मतदारसंघातील सातही पंचायतीचे सरपंच, उपसरपंच व पंच सदस्यांनी काल सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची साखळी येथील रवींद्र भवनात भेट घेऊन केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक गावस, सावर्डे सरपंच चिन्मयी नाईक, दाभाळचे सरपंच दामोदर बांदेकर, कालेचे सरपंच बबन गांवकर, मोलेचे सरपंच वामन गांवकर, साकोर्डा सरपंच प्रिया खांडेपारकर, कुळेचे सरपंच गोविंद शिगांवकर उपस्थित होते. तसेच इतर पंच सदस्य शशिकांत नाईक, नितेश भंडारी, दीपक सावंत, उन्नती वडार, गंगाधर गांवकर, कपिल नाईक, शिरिष देसाई, दामोदर नाईक, महेश नाईक, रवींद्र गांवकर, सौ. संजना नार्वेकर, अनिकेत देसाई, अजय बांदेकर, प्रसाद गावकर, विठोबा मळेकर, बाळू रेकडो, जितेंद्र कालेकर, कल्पेश गावकर, माजी पंच सदस्य बाबा सावर्डेकर, मोहन गावकर, रामकृष्ण गावकर, विलास बिचोलकर, बालाजी मडकईकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

साडेनऊ हजारांची दिली आघाडी

यावेळी पत्रकारांकडे बोलताना सरपंच विनायक गांवस म्हणाले की, आमदार डॉ. गणेश गांवकर यांना मंत्रीमंडळात सामावून घेऊन त्यांना सावर्डे मतदारसंघाचा तसेच इतर मतदारसंघांचा विकास करण्यासाठी चांगले मंत्रीपद द्यावे. कारण आमदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना आपल्या मतदारसंघातून साडेनऊ हजार मतांची आघाडी प्राप्त करून दिली आहे.

धारबांदोड्याच्या विकासासाठी आवश्यक

सावर्डे मतदारसंघ हा खाण भाग आहे. सध्या खाण उद्योग बंद असल्याने खाण अवलंबितांची नाराजी असूनही गावकर यांनी या मतदारसंघात आघाडी मिळवून दिली आहे. धारबांदोडा तालुक्याचा समावेश सावर्डे मतदारसंघात आहे त्यामुळे या तालुक्याचा विकास साधण्यासाठी आमदार गणेश गावकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे गावस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांवर ठेवला विश्वास

कालेचे सरपंच बबन गांवकर म्हणाले की, सावर्डे मतदारसंघ हा पूर्णपणे खाण व्यवसायाचा भाग असल्याने लोक भाजप विरोधात मतदान करणार असा समज अनेकांच्या मनात होता, मात्र आमदार डॉ. गणेश गांवकर तसेच मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून मतदारांनी भाजप उमेदवारासाठी  मतदान केले आहे. या भागात खाण व्यवसाय बंद पडल्याने लोकांवर उपासमारी तसेच बेरोजगारी वाढली आहे, ती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार गणेश गांवकर यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

 भाजपचे कार्य नेले खूप पुढे

सावर्डे पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच शशिकांत नाईक म्हणाले की, अनेकवेळा या मतदारसंघातून भाजपला मतांची मोठी आघाडी दिली जाते,मात्र मंत्रीपद का मिळत नाही असा प्रश्न सध्या जनता उपस्थित करीत आहे.आमदार डॉ. गणेश गांवकर हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्त्व असून हुशार राजकारणी म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. तेव्हा अशा आमदाराला मंत्रीपद द्यावे व सावर्डेच्या विकासाला थोडा हातभार लावावा. भाजपचे कार्य आमदार डॉ. गणेश गांवकर यांनी खूप पुढे नेलेले आहे. त्यासाठी वजनदार खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 जनतेवर अन्याय होऊ नये

भाजप मंडळ जनरल सेक्रेटरी तथा साकोर्डा पंचायतीचे उपसरपंच शिरिष देसाई बोलताना म्हणाले की, मतदारसंघातील जनता आजपर्यंत भाजपसोबत राहिली आहे. म्हणून मतदारसंघातील लोकांवर अन्याय होवू नये म्हणून गणेश गावकर यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री आश्वस्त आहे असे शिरीष देसाई म्हणाले. आमदार गणेश गावकर हे सावर्डे मतदारसंघातील ज्येष्ठ राजकारणी आहेत. ते एक अभ्यासू व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.अशा अभ्यासू आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास त्याचा लाभ गोव्याला तसेच सावर्डे मतदारसंघालाही होऊ शकतो असेही कार्यकर्ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article