महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आमदार डॉ. देविया राणे यांचा वाढदिवस हजारोंच्या उपस्थितीत साजरा

02:43 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाळपई : पर्ये मतदारसंघाच्या आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. देविया राणे यांचा वाढदिवस हजारोंच्या संख्येने उपस्थित समर्थकांच्या समवेत साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत सत्तरी तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातील त्याचप्रमाणे गोव्याच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या प्रमाणात समर्थकांनी हजेरी लावली होती. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत केक कापून वाळपई येथील त्यांच्या कार्यालयात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. अवघ्या दोन वर्षांमध्ये मतदारांच्या हृदयाशी आपुलकीचे संबंध निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरलेल्या पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्या समर्थकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी वाळपईच्या कार्यालयामध्ये हजर होत्या. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध पंचायतींचे सरपंच, नगरपालिकेचे नगरसेवक, माजी सरपंच, माजी नगरसेवक, जिल्हा पंचायत सभासद, माजी जिल्हा पंचायत सभासद, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, स्वयंसेवा संघटनांच्या कार्यकर्त्या यांचा उपस्थितांमध्ये समावेश होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांचा उदंड गर्दी पहावयास मिळाली. संध्याकाळी उशिरापर्यंत त्या आपल्या कार्यालयामध्ये शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारण्यासाठी सज्ज होत्या.

Advertisement

मतदारांशी चांगले संबंध प्रस्तापित केले

Advertisement

यावेळी मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार राणे यांनी मतदारांशी चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या विकासकामांना चालना देत असताना त्यांनी नागरिकांच्या वैयक्तिक समस्या या संदर्भात विशेष लक्ष देऊन एक चांगल्या प्रकारचे नाते निर्माण केले आहे. यामुळे त्यांच्या वाढदिनी हजारोच्या संख्येने समर्थकांची उपस्थिती पहावयास मिळत आहे. येणाऱ्या काळातही त्यांनी प्रामाणिक व पारदर्शक पद्धतीने नागरिकांशी आपले संबंध प्रस्थापित करावेत, असेही ते म्हणाले.

सत्तरीतील जनता म्हणजे परिवाराचा भाग

आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. देविया राणे म्हणाल्या की सत्तरी तालुक्यातील परिवाराने आपला हा वाढदिवस विशिष्ट पद्धतीने साजरा केला. मोठ्या प्रमाणात समर्थकांची उपस्थिती म्हणजे आपल्या परिवारातील एक महत्त्वाचा आनंदाचा क्षण होता. यामुळे येणाऱ्या काळात आपली जबाबदारी वाढलेली आहे. सत्तरीतील जनता हा आपल्या परिवाराचाच भाग आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात समर्थकांनी उपस्थिती लावली. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी सहकार्य केले, असे यावेळी देविया राणे यांनी सांगितले. तऊणपिढीबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्याला आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केलेले आहे. यामुळे येणाऱ्या काळातही हे संबंध कायमस्वरूपी टिकून राहावेत यासाठी आपली जबाबदारी वाढलेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

सासू-सासऱ्यांचे घेतले आशीर्वाद

आमदार डॉ. राणे यांनी आपल्या वाढदिवसाची सुऊवात कुळण येथे आपले सासरे तथा गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व आपल्या सासू सौ. विजयादेवी राणे यांचे आशीर्वाद घेऊन केली. त्याचप्रमाणे विविध मंदिरामध्ये जाऊन त्यांनी देवदर्शनही केले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

वाढदिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खास उपस्थिती लावली होती. त्याचप्रमाणे अनेकांनी फोनवरून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. विविध खात्याचे प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनीही प्रत्यक्षपणे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article