For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार आसिफ सेठ यांची विज्ञान प्रदर्शनाला भेट

03:40 PM Jan 30, 2024 IST | DHANANJAY SHETAKE
आमदार आसिफ सेठ यांची विज्ञान प्रदर्शनाला भेट
आमदार आसिफ सेठ यांची विज्ञान प्रदर्शनाला भेट
Advertisement

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शैक्षणिक विकासाला प्राधान्य दिले आहे. सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक सरकारी शाळांना भेटी देऊन शहरातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत केली आहे.आझम नगर शासकीय शाळेच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शन असल्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिज्ञासा व विज्ञानाची आवड पाहून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार फिरोज सेठ उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले कि, "विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्कंठा आणि उत्साह दिसून येत आहे. आणि मला शाळेला भेट देऊन या प्रदर्शनाचा एक भाग बनल्याचा आनंद झाला आहे. मी अधिक चांगल्या सुविधा आपणास देण्यासाठी कठोर परिश्रम घेईन. माझ्या भागातील सरकारी शाळा हि उत्कृष्ट असली पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. माजी आमदार फिरोज सेठ यांनीही विद्यार्थ्यांशी थोडक्यात संवाद साधला. आणि त्यांना चांगला अभ्यास करण्यास, नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि त्यांचे ज्ञान वाढवत राहण्यासाठी प्रोत्साहित केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.