आमदार असिफ सेठ यांच्याकडून पोलीस दलाला 13 मोटारसायकली
11:38 AM Jul 29, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आमदार निधीतून 13 मोटारसायकली पोलीस दलाला दिल्या आहेत. सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात आयुक्तांना सर्व 13 मोटारसायकलींच्या चाव्या सुपूर्द करून हिरवा झेंडा दाखवला. बेळगाव शहर आणि तालुक्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना मदतीचे ठरावे यासाठी आपल्या आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्चून 13 होंडा (350 सीसी) मोटारसायकली पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्याकडे सुपूर्द केल्या. मोटारसायकलींना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यां बरोबरच मोटारसायकलींवरून आमदारांनी परिसरात फेरफटका मारला.आमदार निधीतून पोलीस दलासाठी 13 मोटारसायकली देणाऱ्या आमदार राजू सेठ यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article