For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोजिमाशि पतपेढीत आमदार आसगांवकर गटाचा सर्व जागावर विजय

01:35 PM Jan 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
कोजिमाशि पतपेढीत आमदार आसगांवकर गटाचा सर्व जागावर विजय
MLA Asgaonkar
Advertisement

१७ पैकी १७ जागावर विजय; विरोधी दादासाहेब लाड गटाचा धुवा

सांगरूळ / वार्ताहर

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीच्या सर्वच्या सर्व 17 जागावर विजयी मिळवला आहे .विरोधी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार आघाडीचा धुवा उडाला आहे .
कोजिमाशी पतपेढीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध .व्हावी म्हणून आमदार जयंत आसगावकर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले .सत्तारूढ गटाला बारा जागा तर विरोधी गटाला पाच जागा देण्याचा प्रस्ताव होता .यावर तोडगा निघाल्याने अखेर निवडणूक लागली . दोन्ही गटाकडून साम-दंड वापरत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती आरोप .प्रत्यारोपाच्या जोरदार फेरी झडल्या होत्या .यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचेलक्ष या निवडणुकीकडे लागले होते.

Advertisement

रविवारी सकाळपासून मतदार गटागटांनी आणण्यासाठी दोन्ही गटात जोरदार चुरस होती .मतदानानंतर मतमोजणी सुरू झाली .सुरुवातीपासून सत्तारूढ गटाने सर्वच्या सर्व जागावर आघाडी घेतली होती .आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे

सर्वसाधारण गट
राजेंद्र सदाशिव कारंडे (९४९) गजानन दिनकर काटकर (९४८ )सरदार विठ्ठल पाटील ( ९२८) ,कृष्णात रामचंद्र पाटील ( ९१८) महादेव पांडुरंग चौगले ( ९१२),के.एच.पाटील ( ९१६ )
सुनील कृष्णात पाटील ( ९०२) धनाजी गुंडू पाटील ( ८९१ ) शिवाजी बापूसो लोंढे ( ८७५), जयसिंग मारुती पवार ( ८६६ ) दिलीप बाबुराव पाटील (८६१) हिंदुराव तुकाराम डोंब ( ८६० )

Advertisement

महिला प्रतिनिधी
रेखा अजित रावराणे ( ९७२ )
सुप्रिया बापूसो शिंदे ( ९२६ )

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
उमेश शामराव माळी ( ९६६)

भटक्या व विभक्ती जाती प्रवर्ग गट
विठ्ठल मारुती लटके (९०२)

अनुसूचित जाती व जमाती
शानाजी विष्णू माने ( ९७८ )

दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार आघाडीचे उमेदवाराना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण गट
अमर वसंत इंगळे ( ७२८ ) मच्छिंद्रनाथ सखाराम शिरगावकर ( ६९५ ) जोतिराम बंडू पाटील ( ७१९) सुभाष गणपती पाटील ( ७१६) प्रदीप रामचंद्र पाटील (७५६ ) जगन्नाथ शरद पोतदार ( ७०६) राजेंद्र मारुतराव साळोखे ( ६९८ ) शिवाजी दगडू गायकवाड ( ७२८ ) मनोहर संभाजी पाटील ( ६९५ ) वैभव दत्तात्रय गुरव ( ७३५) किसन रामचंद्र पाटील ( ७८१)मारुती नारायण पाटील ( ७१५)

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
कैलास निवृत्ती सुतार ( ७७७ )

भटक्या व विमुक्त जाती जमाती
संदीप अण्णासो दाईंगडे ( ७४९)

अनुसूचित जाती व जमाती
दीपक गुंडू कांबळे ( ७६४ )

महिला राखीव प्रतिनिधी
सुनंदा पांडुरंग पवार ( ८०१ ) नेहा नितीन भुसारी ( ७४१)

निवडणुकीसाठी १८२८ पैकी १७६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ९६ .४४ टक्के मतदान झाले होते .
सर्वसाधारण गटात ९८ मध्ये अवैद्य ठरली तर १६६५ मध्ये वैद्य ठरली .महिला राखीव गटात १४ मते अवैद्य तर १७४९ मध्ये वैद्य ठरली .इतर मागासवर्गीय गटात २० मते अवैद्य तर १७४३ मते वैद्य ठरली .अनुसूचित जाती गटात २१ मते अवैद्य ठरली तर १७४२ मध्ये वैद्य ठरली .भटक्या जमाती गटात ५९ मते अवैद्य ठरली तर १७०४ मध्ये वैद्य ठरली.

मतमोजणीच्या सुरुवातीपासून सत्तारूढ गटाने आघाडी घेताच समर्थकानी फटाक्याची आतषबाजी व हलगीचा कडकडाट करत जल्लोष केला .विजय उमेदवारांच्या समर्थकांनी आमदार जयंत आसगावकर यांना उचलून घेत जल्लोष केला.

चांगल्या कारभाराची पोहच
चांगल्या चाललेल्या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही सभासदांची इच्छा होती .आम्ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण विरोधकांना निवडणूक लढवायची होती .सभासदांनी त्याचे योग्य उत्तर दिले असून भविष्यात पतपेढीच्या माध्यमातून जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध राहणार....आमदार जयंत आसगांवकर

सभासदांनी दिलेला कौल मान्य
निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता पण सत्ताधारी गटाने समाधानकारक तोडगा न काढल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली .दिलेला कौल मान्य आहे....दादासाहेब लाड

Advertisement
Tags :

.