For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिचेल स्टार्कचा ‘स्पार्क’, टिपले 6 बळी

06:58 AM Dec 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मिचेल स्टार्कचा ‘स्पार्क’  टिपले 6 बळी
Advertisement

पिंक कसोटीचा पहिला दिवस कांगारुंच्या नावावर  :  टीम इंडिया 180 धावांत ऑलआऊट

Advertisement

वृत्तसंस्था/ अॅडलेड

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या (48 धावांत 6 बळी) घातक गोलंदाजीसमोर अॅडलेडमध्ये खेळवल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय शेर 180 धावांवर ढेर झाले. मिचेल स्टार्कच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकू शकले नाहीत. ना जैस्वाल, ना कोहली, ना कर्णधार रोहित शर्माची बॅट चालली. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 33 षटकांत 1 बाद 86 धावा केल्या आहेत. यजमान संघ अद्याप 94 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेरीस मॅकस्विनी 38 तर लाबुशेन 20 धावांवर खेळत आहेत.

Advertisement

प्रारंभी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट गमावली. पर्थ कसोटीतील शतकवीर यशस्वी जैस्वालला अॅडलेडमध्ये खातेही उघडता आले नाही. जैस्वालला पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने एलबीडब्ल्यू केले. यानंतर दुसरे सलामीवीर केएल राहुल आणि शुभमन गिल या दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमलेली आहे असे वाटत असतानाच विकेटची माळ सुरु झाली. केएल राहुल (37) बाद होणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. स्टार्कच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली 7 धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कनेही त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर काही वेळातच स्कॉट बोलँडच्या चेंडूवर शुभमन गिलही माघारी परतला. गिलने 5 चौकारासह 31 धावांचे योगदान दिले.

पहिल्या सत्रानंतर भारताची धावसंख्या 4 विकेटवर 82 धावा होती. दुसऱ्या सत्रात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी जबाबदारी स्वीकारली. पण ही जोडी फार काळ क्रीझवर टिकली नाही. शुभमननंतर स्कॉट बोलंडनेही रोहित शर्माला आपला शिकार बनवले. रोहितही एलबीडब्ल्यू झाला. काही वेळाने ऋषभ पंतलाही लाबुशेनने झेलबाद केले. पंतने 35 चेंडूत 2 चौकारासह 21 धावा केल्या.

पंत बाद झाल्यानंतर अश्विनने नितीश रे•ाrसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि सातव्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. स्टार्कने अश्विनला 22 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. दुसरीकडे, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह खाते न उघडताच बाद झाले. नितीश रे•ाr स्टार्कचा सहावा बळी ठरला. तो शेवटी 54 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 42 धावा करुन आऊट झाला. बाद होण्यापूर्वी त्याने आक्रमक पवित्रा घेत काऊंटर अटॅक केला. रे•ाrने पहिल्यांदा स्टार्कवर आक्रमण करताना 41 व्या षटकात जबरदस्त षटकार ठोकला. त्यानंतर 42 व्या षटकातही तुफानी फटकेबाजी करताना बोलँडवर प्रहार केला. त्याने 2 षटकार आणि एका चौकारासह 21 धावा कुटल्या. संघाची धावसंख्या दोनशेच्या घरात नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या नितीशचा वारु अखेर 45 व्या षटकात रोखला गेला. स्टार्कनेच त्याला बाद करत टीम इंडियाचा डाव 180 धावांमध्ये संपवला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने शानदार गोलंदाजी करताना 48 धावांत 6 विकेट्स घेतल्या.

कांगारुंची सावध सुरुवात

भारताच्या 181 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ उतरला आणि भारताने त्यांना पहिला धक्का लवकरच दिला. जसप्रीत बुमराहने यावेळी उस्मान ख्वाजाला 13 धावांवर बाद केले. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन आणि नॅथन मॅकस्विनी यांनी सावध खेळ करत दिवस खेळून काढला.  ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवसअखेर 1 बाद 86 अश स्थिती आहे. मॅकस्विनी 6 चौकारासह 38 तर लाबुशेन 3 चौकारासह 20 धावांवर खेळत होते. कांगारुंचा संघ अद्याप 94 धावांनी पिछाडीवर असून आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज काय चमत्कार करतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 44.1 षटकांत सर्वबाद 180 (केएल राहुल 37, शुभमन गिल 31, पंत 21, नितीश कुमार रे•ाr 42, आर. अश्विन 22, स्टार्क 6 बळी, पॅट कमिन्स व स्कॉट बोलँड प्रत्येकी दोन बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 33 षटकांत 1 बाद 86 (उस्मान ख्वाजा 13, लाबुशेन खेळत आहे 20, मॅकस्विनी खेळत आहे 38, बुमराह 1 बळी).

बुमराहची कपिल देव-झहीर खानच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री

टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियालाही सुरुवातीलाच उस्मान ख्वाजाच्या रुपाने पहिला धक्का बसला. बुमराहने ख्वाजाला 13 धावांवर बाद केले. या विकेटसह बुमराहने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावे केली. 2024 मध्ये बुमराहची कसोटी क्रिकेटमधील ही 50 वी विकेट होती. अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत त्याने एंट्री केली आहे. बुमराहच्या आधी या यादीत फक्त कपिल देव आणि झहीर खान यांचीच नावे होती. कपिल देवने हा पराक्रम दोनदा, तर झहीर खानने एकदा हा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाच्या फारच कमी वेगवान गोलंदाजांनी एका वर्षात 50 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. कपिल देव यांनी 1979 आणि 1983 मध्ये अनुक्रमे 74 आणि 75 कसोटी विकेट घेतल्या होत्या. तर झहीर खानने 2002 मध्ये 51 कसोटी विकेट घेतल्या होत्या. यानंतर तब्बल 22 वर्षानंतर बुमराहने हा कारनामा केला आहे.

पर्थ कसोटीत जैस्वाल नडला, अॅडलेडमध्ये स्टार्कने घेतला बदला

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना अॅडलेड येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालला पायचीत केले. पर्थ कसोटीत यशस्वी जैस्वालने मिचेल स्टार्कला स्लेजिंग केले होते. स्टार्कचा चेंडू खूप हळू येत आहे, असे जैस्वाल म्हणाला होता. पण, अॅडलेड कसोटीत स्टार्कने जैस्वालला पहिल्या चेंडूवर बाद करून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, जैस्वालला पहिल्याच चेंडूवर बाद केल्यानंतर स्टार्कने जोरदार सेलिब्रेशन केल्याचे पहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियात लोडशेंडिग, सामन्यात दोन वेळा फ्लड लाईट बंद

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात टीम इंडियाचा डाव लवकर आटोपला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या सत्रात फलंदाजी करत असताना अंधार पडायला सुरुवात झाली. यावेळी मैदानावर फ्लडलाईट सुरु झाले. पण काही वेळात तांत्रिक बिघाडामुळे मैदानावर सर्व फ्लड लाईट अचानक काही काळ बंद झाले. यावेळी संपूर्ण मैदानात अंधार पसरला होता. दोन वेळा असा प्रसंग सामन्यादरम्यान घडला.

Advertisement
Tags :

.