महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मिचेल स्टार्कलाही आता फ्रँचायझी क्रिकेटचे वेध

06:18 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रिकेटच्या एका प्रकारातून निरोप घेण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

ऑस्ट्रेलियन संघाकडील बांधिलकीमुळे जवळजवळ दशकभर फायदेशीर खासगी टी-20 लीगच्या आमिषापासून दूर राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आता त्याच्या वेळापत्रकात अधिक फ्रँचायझी क्रिकेटला जागा देण्यासाठी क्रिकेटच्या एका स्वरुपाला सोडण्याचे संकेत दिले आहेत. या 34-वर्षीय खेळाडूने त्याला कोणत्या स्वरूपाचा त्याग करायचा आहे हे स्पष्ट केलेले नाही. परंतु पुढील 50 षटकांच्या सामन्यांचा विश्वचषक 2027 मध्ये होणार असून हे लक्षात घेऊन तो एकदिवसीय क्रिकेटचा निरोप घेण्याची शक्यता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रु. देऊन करारबद्ध केलेल्या स्टार्कने स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात शानदार कामगिरी केली. त्याने शाहऊख खानच्या मालकीच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलताना बाद फेरीतील दोन सामन्यातींल 5 बळींसह 17 बळी मिळवले. फ्रँचायझी क्रिकेटमधील त्याच्या या सर्वोत्तम वर्षानंतर येथून पुढे त्याची वाटचाल कशी राहील या प्रश्नावर बोलताना स्टार्कने टी-20 ला त्याच्या कारकिर्दीमध्ये जस्त महत्त्व प्राप्त होऊ शकते, असे संकेत दिले.

‘गेल्या नऊ वर्षांपासून मी नक्कीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटला प्राधान्य दिलेले आहे. माझ्या शरीराला विश्रांती मिळावी आणि माझ्या पत्नीसोबत क्रिकेटपासून दूर काही वेळ घालवण्याची संधी मिळावी म्हणून मी अनेकदा अंग काढून घेतलेले आहे’, असे स्टार्कने सनरायझर्स हैदराबादविऊद्धच्या आयपीएल फायनलमध्ये 14 धावा देऊन 2 बळी घेणारी मॅच विनिंग कामगिरी केल्यानंतर बोलताना सांगितले. ‘पुढच्या वाटचालीबद्दल सांगायचे झाल्यास मी निश्चितपणे माझ्या कारकिर्दीच्या समाप्तीच्या जवळ आहे. पुढील विश्वचषकापर्यंत बराच वेळ असल्याने एक प्रकार वगळला जाऊ शकतो. तो प्रकार वगळो किंवा न वगळो, पण भरपूर फ्रँचायझी क्रिकेटसाठी दरवाजे खुले होतील’, असे त्याने सांगितले.

यंदाच्या आयपीएलची 1 जूनपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने मदत होईल, हे स्टार्कने मान्य केले. पुढच्या वर्षीही ‘केकेआर’साठी खेणयला मिळेल अशी त्याला आशा आहे. ‘मला वेळापत्रक माहीत नाही. पण मी यंदा खूप आनंद घेतला आहे आणि पुढच्या वर्षी परत येण्याची आशा आहे’, असे तो म्हणाला. इतर अनेकांप्रमाणे स्टार्कनेही मान्य केले की, इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे आयपीएलमध्ये मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या आणि टी-20 विश्वचषकात 270 इतक्या मोठ्या धावसंख्या पाहायला मिळणार नाहीत. खराब झालेल्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना अधिक मदत मिळू शकते असे भाकीत त्याने केले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article