कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गायब इसम 30 वर्षांनी परतला, तेच कपडे, तेच तिकीट

06:42 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एखादा व्यक्ती अचानक गायब झाल्यास आणि 30 वर्षांनी ज्या दिवशी तो घरातून निघाला, त्याच अवस्थेत परतल्यास काय घडेल? न वाढलेले वय दिसणे, न कपडे बदलणे आणि कुठल्याही बदलाशिवाय तो आला तर. अशीच चकित करणारी घटना समोर आली आहे. एक इसम तीन दशकांनी घरी परतला आणि परिवार त्याला पाहून हैराण, भीतीला सामोरे गेला. हे प्रकरण आता एक रहस्य ठरले आहे. अखेर हा इसम 30 वर्षांमध्ये कुठे होता आणि तोच त्याच कपड्यांमध्ये कसा परत आला, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisement

जेव्हा हा इसम घराच्या दरवाजावर पोहोचला, तेव्हा घरातील लोक त्याला प्रथम ओळखू शकले नाहीत, 30 वर्षांनी अशाप्रकारे त्याचे येणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. त्याचा चेहरा जवळपास तसाच होता, त्याच्या कपड्यांमध्येही कुठलाही बदल नव्हता, तो शारीरिक स्वरुपात ही जवळपास गायब झालेल्या वयाप्रमाणे वाटत होता, असे त्याच्या परिवाराचे सांगणे आहे.

Advertisement

या घटनेमुळे परिवार भीती आणि आनंदाच्या संमिश्र स्थितीत बुडाले, अखेर हे सर्व घडले कसे हेच त्यांना समजत नव्हते. परिवाराने पोलिसांकडे तक्रार नोंदविली, शोध झाला, परंतु कुठलाच थांगपत्ता लागला नव्हता, काही वर्षांनी बहुधा त्याचा मृत्यू झाल्याचे सर्वांनी मानले. परिवाराने दरवर्षी त्याचे स्मरण केले, परंतु परत येण्याची आशा संपुष्टात आली होती.

बेपत्ता होण्याची तक्रार

वासिले गोर्गोस आता 95 वर्षांचे आहेत. पूर्व रोमानियाच्या एका छोट्या गावात राहणारे ते पशुपालक होते. 1991 मध्ये ते कामासाठी घरातून बाहेर पडले होते, त्यांच्या परतीचे रेल्वेतिकीटही होते. परंतु ते न परतल्याने परिवाराने बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी मोठा शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. अनेक वर्षे उलटली आणि परिवाराने वासिले यांचा मृत्यू झाल्याचे मानत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रमही करविले.

अज्ञात कारने घरापर्यंत सोडले

मग 9 ऑगस्ट 2021 रोजी अचानक काही विचित्र घडले. वासिले घराबाहेर दिसून आले. एक कार घराबाहेर थांबली, वासिले यांना उतरविले आणि वेगाने तेथून निघून गेली. कुणाला कारचा क्रमांकही दिसून आला नाही, असे लोकांनी सांगितले. वासिले हे 1991 मध्ये घरातून बाहेर पडताना ज्या कपड्यांमध्ये होते, त्याच कपड्यांमध्ये घरी परतले. त्यांच्या खिशात जुने ओळखपत्र आणि तेच परतीचे रेल्वे तिकीटही होते, जे कधीच वापरले गेले नव्हते.

डॉक्टरांना त्यांची स्थिती पाहून आश्चर्य वाटले. ते नर्वस सिस्टीमच्या समस्या वगळता स्वत:च्या वयानुसार अत्यंत ठीक होते. आपला जन्म 1928 मध्ये झाल्याचे आणि आपली पत्नी हयात नसल्याचे आठवणीत होते. ते एका मोठ्या व्यापाऱ्याचे पुत्र होत्sढ. परंतु स्वत:चा पुत्र आणि कन्येला ते ओळखू शकत नव्हते.

30 वर्षांमध्ये काय घडले

कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी इतकी वर्षे कुठे होता, अशी विचारणा केली, वाढलेले वय का दिसत नाही, कपडे इतकी वर्षे टिकून कसे राहिले असेही प्रश्न विचारले, परंतु त्यांनी कुठलेच स्पष्ट उत्तर दिले नाही. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. कुणी त्यांना 30 वर्षांपर्यंत कुठे ठेवले होते या प्रश्नावर तपास आधारित आहे. सध्या त्यांच्या कपड्यांचे आणि वैद्यकीय स्थितीचे परीक्षण केले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article