महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लाल सागरात इस्रायली जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले

06:32 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हूती बंडखोरांकडून इस्रायल लक्ष्य : गाझामध्ये आतापर्यंत 10 हजार हवाई हल्ले

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

Advertisement

इस्रायल-हमास युद्ध हळूहळू अन्य भागांमध्येही फैलावत आहे. येमेनच्या हूती बंडखोरांनी लाल समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे इस्रायलच्या जहाजांवर हल्ले केले आहेत. याचबरोबर येमेनच्या होदायदा बंदरापासून 101 किलोमीटर अंतरावरील एका शिप कंटेनरलाही नुकसान पोहोचले आहे.

तर लाल समुद्रातील अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ले करू पाहणाऱ्या 3 ड्रोन्सना नष्ट करण्यात आले आहे. हूती बंडखोरांकडून करण्यात आलेले हल्ले सुमारे 5 तासांपर्यंत सुरू राहिल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. मागील महिन्यात हूती बंडखोरांनी एका जहाजाचे अपहरण केले होते. हे जहाज तुर्कियेकडून भारताच्या दिशेने येत होते. इस्रायली जहाजांवरील हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे हूती बंडखोरांनी म्हटले आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत इस्रायलने गाझामध्ये 10 हजार हवाई हल्ले केले असल्याची माहिती आयडीएफने दिली आहे. तर गाझामधील मृतांचा आकडा 15,500 हून अधिक झाल्याचा दावा हमासकडून करण्यात आला. हमासचा एक बटालियन कमांडर हाथम खोआजारीचा खात्मा करण्यात आल्याचे आयएडीफकडून सांगण्यात आले. खोआजारीने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या एका बटालियनचे नेतृत्व केले होते.

दक्षिण गाझातही इस्रायलची रणगाडे

उत्तर गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशन राबविल्यावर आता इस्रायली सैन्य दक्षिणेच्या दिशेने सरकत आहे. याकरता लोकांना अनेक भाग रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. मागील 24 तासांमध्ये इस्रायलच्या बॉम्बवर्षावात 316 जण मारले गेले आहेत. तर 600 हून अधिक जण जखमी झाले आहेत. लेबनॉन, तुर्कियेपासून कतारमध्ये लपून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना शोधून ठार करू, मग भले यासाठी कितीही वर्षे लागू दे असे इस्रायलची देशांतर्गत गुप्तचर यंत्रणा रोनेन बारने म्हटले आहे. याचदरम्यान लेबनॉनच्या भूभागातून इस्रायलच्या शहरांवरील हल्ले वाढले आहेत. आता तेथून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रs डागण्यात आली असून यामुळे काही इस्रायली सैनिक जखमी झाले आहेत.

गाझामध्ये आयडीएफकडून ब्लॉकेड

आयडीएफने हमासच्या पूर्ण खात्म्याचे लक्ष्य निर्धारित केले असून याकरता अनेक टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत गाझाला अनेक हिस्स्यांमध्ये विभागण्यात येत असून याला ब्लॉकेड स्टॅटेजी म्हटले गेले आहे. हमासचे दहशतवादी अनेक ठिकाणांवर वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागले जावेत, जेणेकरून त्यांना शोधणे अवघड ठरू नये असा यामागचा उद्देश आहे. आयडीएफने सध्या दक्षिण गाझावर लक्ष केंद्रीत केले आहे. याचमुळे येथे ग्राउंड ऑपरेशनपूर्वी हवाई हल्ले केले जात आहेत.

ब्रिटनकडुन हवाई टेहळणी

इस्रायल आणि गाझामधील स्थितीचा आढावा ब्रिटनचे संरक्षण मंत्रालय घेणार आहे. याच्या अंतर्गत ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सची टेहळणी विमाने वापरण्यात येणार आहेत. हे सर्व ड्रोन्स असतील आणि त्यांचा युद्धाकरता वापर केला जाणार नाही. या टेहळणीचा उद्देश हमासच्या कैदेत असलेल्या ओलीसांचा शोध लावणे देखील असल्याचे ब्रिटनकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article