महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वेबाबत काँग्रेसकडून दुष्प्रचार

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा आरोप : संपुआच्या काळात रेल्वेसुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसुरक्षेवर भूमिका मांडली. यावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अलिकडच्या काळात घडलेल्या दुर्घटनांवर प्रश्न विचारत गोंधळ घातला आहे. आता ज्या पक्षाचे सदस्य गोंधळ घालत आहेत, तो पक्ष सत्तेवर असताना 58 वर्षांमध्ये एक किलोमीटर अंतराइतके देखील स्वयंचलित रेल्वेसुरक्षा (एटीपी) यंत्रणा बसवू शकलेला नाही. परंतु आता काँग्रेसचे सदस्य प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवत आहेत असा शब्दांत वैष्णव यांनी विरोधकांना निरुत्तर केले.

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्या दुर्घटनांचे प्रमाण 0.24 वरून 0.19 आल्यावर सांगायच्या आणि काँग्रेस तसेच अन्य पक्षांचे सदस्य सभागृहात टाळ्या वाजवायचे. आता हेच प्रमाण 0.19 वरून कमी होत 0.3 वर आल्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून आरोप केले जात आहेत. हा देश अशाचप्रकारे चालणार का? काँग्रेसची सोशल मीडिया टीम स्वत:च्या ट्रोलसैन्याच्या मदतीने अफवा पसरवत आहे. काँग्रेसकडून प्रतिदिन रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या 2 कोटी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.

संपुआच्या कार्यकाळात सरासरी वार्षिक 171 रेल्वे दुर्घटना घडत होत्या. आमच्या सरकारच्या काळात दुर्घटनांच्या संख्येत 68 टक्क्यांची घट झाली असल्याचे वैष्णव यांनी सांगताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान वैष्णव यांनी विरोधी पक्षांनी स्वत:च्या कार्यकाळात डोकावून पाहावे, काँग्रेसने स्वत:च्या 58 वर्षांच्या शासनकाळात एटीपी देखील लावले नसल्याची टीका केली.

कवचच्या वर्जन 4.0 ला मंजुरी

जगात मोठ्या रेल्वे नेटवर्कनी एटीपी लागू केला. यामुळे चालकाला हायस्पीड ट्रेनमध्ये सिग्नल पाहण्यास सुलभता होते. हे तंत्रज्ञान जगात 80 च्या दशकात आले. भारतात 2014 पर्यंत नव्हते. 2006 साली एंटी कोलीजन डिव्हाइस आणले गेले, परंतु ते 2012 मध्ये अपयशी ठरले. पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये कार्यभार स्वीकारल्यावर 2016 मध्ये कवच आणले गेले. 2019 मध्ये याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले. कोरोना संकटाच्या काळातही 2020-21 मध्ये याचे परीक्षण होत राहिले. 2024 मध्ये कवचचे वर्जन 4.0 ला मंजुरी मिळाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

50 नव्या अमृत भारत निर्मितीचा निर्णय

जानेवारीत अमृत भारत रेल्वेची निर्मिती पूर्ण झली. दोन अमृत भारत रेल्वे सध्या धावत आहेत. 22 डब्यांपैकी निम्मे स्लीपर तर निम्मे जनरल श्रेणीचे आहेत.  यातील सुविधा अत्यंत उत्तम आहे. आणखी 50 अमृत भारत रेल्वेगाड्या निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रेल्वे 400 रुपयांच्या तिकीटदरात 1 हजार किलोमीटरचा  प्रवास घडविते. या रेल्वेत धक्के बसत नाहीत. उत्तम टॉयलेट्स आहेत. बर्थचे डिझाइन बदलण्यात आले आहे. रेल्वेत आणखी 13 नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्या नव्या रेल्वेगाड्यांमध्ये दिसून येतील असे वैष्णव यांनी सांगितले.

आणखी 2500 जनरल डब्यांची निमिर्ती

गरीबातील गरीब व्यक्ती रेल्वेमुळे दीर्घ पल्ल्याचा प्रवास कमी पैशात करतो. याच भावनेसोबत मागील 10 वर्षांमध्ये अनेक पावले उचलण्यात आली आहेत. एसी कोच्या तुलनेत जनरल कोच दोन तृतीयांश इतके आहेत. 2500 अतिरिक्त जनरल डब्यांची निर्मिती होत असल्याची माहिती वैष्णव यांनी संसदेला दिली.

विरोधी पक्षांकडूनच वंदे भारतची मागणी

विरोधी पक्षांच्या खासदारांनी वंदे भारत रेल्वेची मागणी केली आहे. संसदेत गोंधळ घालणारे खासदारच या रेल्वेगाडीची मागणी करत आहेत. 2015 मध्ये जागतिक दर्जाची हायस्पीड रेल्वे आणण्याचे ठरल्यावर पंतप्रधान मोदींनी विदेशातून तंत्रज्ञान मागवू नका, भारतीय इंजिनियर्स डिझाइन तयार करतील असे स्पष्ट केले.  आता वंदे भारत रेल्वे भारताच्या युवांवरील विश्वासाचे उदाहरण असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article