महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राधा-रानी वादावर मिश्रांची क्षमायाचना

06:15 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / मथुरा

Advertisement

भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातील महत्वाची व्यक्ती राधा यांच्यासंबंधी अवमानजन भाषेचा उपयोग केल्यामुळे उत्तर भारतातील साधुसंत आणि सर्वसामाध्य जनता यांच्या संतापाचे कारण बनलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांनी अक्षरश: नाक घासून क्षमायाचना केली आहे. त्यांनी मथुरेनजीकच्या बरसाना येथे जाऊन धर्माचार्यांच्या सभेत ही क्षमायाचना शनिवारी केली. आपल्या विधानांचा आपल्यालाच खेद होत आहे. त्यामुळे मी नाक घासून विनाशर्त क्षमा मागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

हा राधारानी वाद गेल्या काही आठवड्यांपासून भडकला आहे. प्रदीप मिश्रा यांच्या विधानांमुळे कृष्णभक्तांमध्ये संतापाची भावना आहे. मथुरा आणि परिसरातील साधु-संतांनी तर मिश्रा यांना अंतिम इशारा दिला होता. बरसाना येथे आमच्यासमोर स्वत: येऊन क्षमायाचना केली पाहिजे, असे त्यांनी बजावले होते. मथुरा जिल्ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेतली होती. अखेर शनिवारी मिश्रा यांनी क्षमायाचना केल्याने या वादावर पडदा पडला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article