कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Miraj Civil Hospital : बाळ माझेच, मीच जन्म दिलाय... महिलेच्या बहाण्याने पोलीसही चक्रावले

05:39 PM May 06, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

गरोदर आहे बाळाला जन्म द्यायला जाते म्हणून तिने गाव सोडले होते

Advertisement

By : रमेश मस्के

Advertisement

सांगली (सावळज) : तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये मिरजेतून बाळाला चोरून ती रहायला आली. गरोदर आहे बाळाला जन्म द्यायला जाते म्हणून तिने गाव सोडले होते. तीन दिवसांपूर्वी ती बाळासह आली आणि हे बाळ चोरीचे असल्याची माहिती उघड झाल्याने पकडली गेली. पण, पकडल्यानंतरही तिचा आवेश वेगळाच होता. बाळ माझेच आहे, मीच जन्म दिलाय या तिच्या पवित्र्याने क्षणभर पोलीसही चक्रावले. पण, तिला घेऊनच त्यांनी सावळज गाव सोडले. ती कबूल होईल याची पोलिसांना आशा आहे.

सारा सायबा साठे सावळजमध्ये डोंगरसोनी रोडला भाड्याच्या घरात राहते. चारच महिन्यांपूर्वी ती या भागात राहायला आली. त्यापूर्वी दोन वर्षे तिचे गावात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य होते असे सांगतात. भोळसट स्वभावाचा तिचा पती एक सामान्य रंगारी कारागीर आहे. एका रंग दुकानात तो काम करतो. ज्या भागात ती रहायला आली तिथे तिने आपण गरोदर असून लवकरच बाळंतपणासाठी रुकडी गावी जाणार असल्याचे आसपासच्या लोकांना सांगितले होते.

उपलब्ध माहितीनुसार, पतीने बाळंतपणाच्या खर्चासाठी दुकानदाराला सांगून २५ हजाराची उचल घेऊन पैसे तिला सुपूर्द केले होते. काही दिवसांपूर्वी तिने गाव सोडले. तीनच दिवसांपूर्वी ती बाळाला घेऊन सावळजला रहायला आली. बाळ जन्माला येताच काही दिवसात आपण इकडे राहायला आलो असा बनाव तिने केला. सावळज परिसरात जेथे ती राहते तेथे कुणाला काही माहिती दिसणाऱ्या स्त्री सारखीच स्त्री सावळज मध्ये आहे.

तिने नुकतेच बाळाला जन्म दिला असून बाळ घेऊन ती माहेरहून परत आली असल्याची माहिती पोलिसांना समजली. दरम्यान, मिरजेचे गांधी चौक पोलिस ठाण्याचे पथक तिथे पोहोचले. त्यांनी सारा साठे हिच्याकडे चौकशी सुरू केली. मात्र अशा प्रसंगाला सामोरे जाण्यास तयार असल्याप्रमाणे तिने आपण गरोदर होतो, बाळाला जन्म दिला, आपण जन्म दिलेले ते हेच बाळ आहे अशी माहिती सांगून पोलिसांनाही चकित करून सोडले. तासगाव पोलीस ठाण्यात तिला घेऊन जात आहोत असे जाहीर करून पोलीस

बाळ आणि त्याच्या कथित आईसह रवाना झाले. अखेर रात्री उशिरा तिला पोलिस ठाण्यात ठेवून बाळाला त्याच्या आईकडे सोपविण्यासाठी मिरज सिव्हिल होईल याची तिला अपेक्षा नसावी. मात्र कुठूनतरी बातमी फुटली. वृत्तपत्रात आलेल्या छायाचित्रात हॉस्पिटलमध्ये पोलीस रवाना झाले.

Advertisement
Tags :
#Police action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediamiraj civil hospitalmiraj newspolice investigationsangli news
Next Article