For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : वाईत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; थकीत पगार व पीएफसाठी ठिय्या

05:35 PM Dec 14, 2025 IST | NEETA POTDAR
satara news   वाईत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन  थकीत पगार व पीएफसाठी ठिय्या
Advertisement

                     NDK कंपनीविरोधात वाईत संतप्त कर्मचाऱ्यांचे रस्त्यावर आंदोलन

Advertisement

वाई : वाई नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पीएफ व ईएसआयसारख्या कायदेशीर सुविधा थकवल्याच्या निषेधार्थ संबंधित NDK कंपनी विरोधात शनिवारी किसनवीर चौकात जोरदार काम बंद आंदोलन करण्यात आले. संतप्त कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत प्रशासन व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र निदर्शने केली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील अनेक महिन्यांचे पगार NDKकंपनीकडून अद्याप देण्यात आलेले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही वेतन मिळत नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी काम थांबवून रस्त्यावर उतरण्याचा निर्णायक पवित्रा घेतला. कर्मचायांनी किसनवीर चौकात नवीन घंटागाडीचे ट्रक रांगेत उभे करून त्यांच्या समोरच धरणे आंदोलन केले.

Advertisement

दरम्यान, स्वप्निल भाई गायकवाड, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत व भाजपचे शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांच्या मध्यस्थीने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, सोमवारपर्यंत संबंधित ठेकेदाराने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पीएफ, ईएसआय व थकीत वेतनाबाबत ठोस खुलासा करून देणे आवश्यक असून, अन्यथा सोमवारी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आदोलनस्थळी शिवसेना नेते योगेश फाळके व मराठा महासंघाचे विक्रम वाघ, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, भाजपचे शहराध्यक्ष विजय ढेकाणे, अमित वनारसे, सचिन मानकुंबरे, स्वप्निल भिलारे आदिनी भेट दिली.

Advertisement
Tags :

.