For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्जरी क्लीनिकचा चमत्कार व्हायरल

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्जरी क्लीनिकचा चमत्कार व्हायरल
Advertisement

एका व्यक्तीला केले 30 वर्षे तरुण

Advertisement

इस्तंबुल येथील एक प्लास्टिक सर्जरी क्लीनिक स्वत:च्या येथे झालेल्या सर्जरीच्या बिफोर-आफ्टर छायाचित्रावरून चर्चेत आले आहे. ही छायाचित्रे विश्वास ठेवण्यास अशक्य वाटावे अशी आहेत. एस्टे मेड क्लीनिकने रुग्ण मायकलच्या बिफोर-आफ्टर छायाचित्रासोबत इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. या छायाचित्रात मायकलचे वय 20-30 वर्षांनी कमी वाटते. त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर झाल्या. तर कपाळावर चांगल्या संख्येत केस होते आणि नाक देखील अत्यंत शेपमध्ये होते. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या स्वत:च्या ‘आफ्टर’ छायाचित्रात मायकल इतके तऊण दिसून येत होते की, काही लोकांनी ‘तुम्हाला टाइम मशीनमध्ये टाकले होते का’ अशी विचारणा केली आहे. दोन्ही छायाचित्रे एकत्रित पोस्ट करण्यात आली नसती तर बहुतांश लोकांना ही एकच व्यक्ती असल्याचा अंदाजच बांधता आला नसता. एस्टे मेडच्या प्रोफाइलवर नजर टाकल्यावर अशा पोस्ट्स दिसून येतात.

या दोन्ही व्यक्तींचा डेंटल रिकोर्ड, बोटाचे ठसे आणि ब्लड स्टेट रिपोर्ट पाहण्याची गरज आहे, कारण तुर्कियेत नेमकं काय चाललय असे एका युजरने मायकलच्या छायाचित्रांवर कॉमेंट करताना म्हटले आहे. या अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशनसाठी मायकल याला अनेक शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले, ज्यात फेसलिफ्ट, पापण्यांवरील ब्लेफेरोप्लास्टी, फॅट रिमुव्हल, राइनोप्लास्टी आणि हेअर ट्रान्सप्लांट सामील असल्याचे एस्टे मेडने सांगितले आहे. परंतु काही तज्ञांनी या दाव्याबद्दल संशय व्यक्त केला आहे. ट्रान्सफॉर्मेशन इतके परिपूर्ण आहे की डिजिटल एडिटिंग वाटतेय असे ते म्हणत आहेत. ब्रिस्टल येथील सल्लागार प्लास्टिक सर्जन डॉ. निगेल मर्सर यांनी मायकलच्या ‘पूर्वी’च्या छायाचित्रात त्याच्या त्वचेची रचना पाहिल्यास तो धूम्रपान करत होता किंवा तो वृद्ध असल्याचे कळते असे म्हटले आहे. तर नंतरच्या छायाचित्रात त्वचा 35 वर्षांच्या व्यक्तीची आहे आणि हे शक्य नसल्याचे मर्सर म्हणाले. पूर्वीच्या आणि नंतरच्या त्याच्या चेहऱ्याच्या आकार अत्यंत वेगळा आहे. केवळ फॅट हटवून असे करू शकत नाही असा दावा मर्सर यांनी केला. परंतु प्लास्टिक सर्जरी क्लीनिकची छायाचित्रे आणि दाव्यामध्ये कितपत सत्य हे सांगता येत नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.