महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिराबाई चानूच्या प्रशिक्षणाला प्रारंभ

06:28 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

26 जुलैपासून सुरू होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताची महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूने आपल्या खडतर प्रशिक्षणाला प्रारंभ केला आहे. ही स्पर्धा आता दोन दिवसांवर येवून ठेपली असल्याने मिराबाईने जोरदार सराव सुरू केला आहे.

Advertisement

29 वर्षीय वेटलिफ्टर मिराबाई चानूने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते. पॅरिसमधील ला फर्टे-मिलॉनमध्ये मिराबाईचे प्रशिक्षण सुरू असून  मंगळवारी केंद्रिय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी मिराबाई चानूसमवेत प्रशिक्षणावेळी व्हिडीओ प्रसारित केला आहे. 2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्मर्धेत मिराबाई चानूने 49 किलो वजन गटात रौप्य पदक मिळविले होते. त्या स्पर्धेमध्ये चानूने एकूण 202 किलो वजन उचलले होते. ऑलिंपिक स्पर्धेत रौप्य पदक मिळविणारी मिराबाई चानू ही भारताची पहिली महिला वेटलिफ्टर ठरली आहे. यापूर्वी म्हणजे इ.स. 2000 च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या करनाम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींग प्रकारात क्लिन आणि जर्क यामध्ये 115 किलो वजन उचलून ऑलिंपिक विक्रम केला होता.

112 अॅथलिटस्च्या भारतीय पथकाची पॅरिस ऑलिंपिक मोहीम 25 जुलैपासून सुरू होईल. भारतीय पथकातील खेळाडू या स्पर्धेतील 16 क्रीडा प्रकारात 69 पदकांसाठी लढत देतील. अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात भारताचा भालाफेकपटू आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता निरज चोप्राच्या नेतृत्वाखाली 29 अॅथलिटस् सहभागी होत आहेत. ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी पाठविण्यात आलेला भारताचा हा दुसरा सर्वाधिक खेळाडूंचा चमु आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये यावेळी भारताचे 15 नेमबाज सहभागी होणार असून त्यांच्याकडून अधिक पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे. मिराबाई चानूया या स्पर्धेतील मोहीमेला 7 ऑगस्ट प्रारंभ होईल. पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबलटेनिस, मुष्टीयुध्द, अश्वदौड, गोल्फ, हॉकी, ज्युदो, नौकानयन, सेलिंग, नेमबाजी, जलतरण, टेबलटेनिस आणि टेनिस या प्रकारात भारताचे स्पर्धक भाग घेणार आहेत

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article