महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मीराबाई चानूचे पदक थोडक्यात हुकले

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारताला दोन मोठे धक्के बसले. एकीकडे स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट वजनामुळे अपात्र ठरली तर त्याचवेळी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूचेही पदक देखील हुकले. तिने 199 किलो वजन उचलून ती चौथ्या स्थानावर राहिली तर चीनला सुवर्ण तर रोमानियाच्या खेळाडूने रौप्य आणि थायलंडच्या खेळाडूने कांस्य पदक मिळवल्याने वेटलिफ्टिंगमध्ये भारताची पदकाची संधी हुकली आहे. विशेष म्हणजे, या इव्हेंटनंतर मीराबाईनेही सांगितले की तिच्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता, त्यामुळे सर्व तिच्यासाठी खूप कठीण होते. माझ्या परीने मी प्रयत्न केले पण यशापर्यंत पोहोचता आले नसल्याची खंत तिने व्यक्त केली.

Advertisement

मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 202 किलोचे वजन उचलून रौप्य पदक मिळवले होते. तिने स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले होते. यंदाच्या ऑलिम्पिकमध्येही शानदार कामगिरी करत तिने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, तिचे पदकाचे स्वप्न केवळ एका किलोने भंगले. तिसरे ऑलिम्पिक खेळत असलेल्या मीराबाईने 49 किलो गटात चौथे स्थान पटकावले. तिने एकूण 199 किलो वजन उचलले, ज्यामध्ये 88 किलो स्नॅच आणि 111 किलो क्लीन अँड जर्कचा समावेश होता. तर चीनच्या हौ शिहुईने 206 किलो वजन उचलून पहिला क्रमांक पटकावला. रोमानियाची मिहाएला कॅम्बी 205 किलो वजन उचलून दुसऱ्या तर थायलंडची सुरोदचना खांबाओने 200 किलो वजन उचलून तिसऱ्या स्थानावर राहत कांस्यपदक पटकावले.

एमसीचा तिसरा दिवस तरीही यशस्वी झुंज

पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीवर मीराबाई चानू म्हणाली, आज माझे नशीबही खराब होते आणि माझी पीरियड देखील होती. आज माझ्या एमसीचा तिसरा दिवस होता. असे असतानाही मी माझ्या परीने प्रयत्न केले. यावेळी पदक देऊ न शकल्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. ते माझ्या नशिबात नव्हते.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन मी आणि माझ्या प्रशिक्षकांनी यावेळी खूप प्रयत्न केले. पदक जिंकू शकले नाही यासाठी देशवासीयांची मी माफी मागते.

महिला वेटलिफ्टर, मीराबाई चानू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article