चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचा खून
12:04 PM May 10, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
खुनानंतर तो गटारीत टाकण्यात आला होता. विकासचा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा झाला नव्हता. मात्र, अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, उपनिरीक्षक जी. एस. उप्पार, ऐगळीचे पोलीस उपनिरीक्षक कुमार हाडकर, मल्लिकार्जुन तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. 28 एप्रिल 2025 रोजी रात्री अथणी येथील एका फर्निचर दुकानात चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी अल्पवयीन मुलाला पकडून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अब्दुलबारी अब्दुलरजाक मुल्ला (वय 36), जुबेरअहमद महम्मदअक्रम मौलवी (वय 34), बिलालअहमद मुक्तारअहमद मौलवी (वय 25), हजरत बिलालमहम्मद इसाली नालबंद (वय 28), फयुम मुसा नालबंद (वय 27), महेश संजय काळे (वय 36) सर्व राहणार अथणी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.
Advertisement
हुलगबाळीत आढळलेल्या मृतदेहाचा उलगडा : अथणीच्या सहा जणांना अटक
Advertisement
बेळगाव : अथणी तालुक्यातील हुलगबाळी रोडवर आठ दिवसांपूर्वी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह हुलगबाळी रोडवर टाकून दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अथणी येथील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या गुरुवार दि. 1 मे रोजी सकाळी अथणी-हुलगबाळी रस्त्याशेजारी सुमारे 15 ते 25 वर्षीय अनोळखीचा मृतदेह आढळून आला होता. खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी हा मृतदेह रस्त्याशेजारी टाकून देण्यात आला होता. मुळात मृतदेह कोणाचा, याचाही तपास लागला नव्हता. शेवटी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. विकास शिवदास कोष्टी (वय 17) राहणार अरळीहट्टी, ता. अथणी या अल्पवयीन मुलाचा तो मृतदेह होता.
Advertisement
Advertisement
Next Article