For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad Crime : कराडमध्ये इन्स्टाग्राम वादातून अल्पवयीन मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला

04:56 PM Nov 06, 2025 IST | NEETA POTDAR
karad crime   कराडमध्ये इन्स्टाग्राम वादातून अल्पवयीन  मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला
Advertisement

                              सोशल मीडियावरील वादातून अल्पवयीनवर हल्ला

Advertisement

कराड : इन्स्टाग्रामवरील वादातून शहरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुजावर कॉलनी चौक ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी जखमी अल्पवयीन मुलाचे वडील फैयाज गणी बारगीर (वय ४९, रा. दौलत कॉलनी, कराड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून यावरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैयाज बारगीर यांचा १५ वर्षाचा मुलगा हा संशयितांना ओळखत होता. ४ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास १५ वर्षांचा मुलगा यास इन्स्टाग्रामवरून संदेश व फोन आला. त्यानंतर तो घरात बर्थ डेला जातो, असे सांगून बाहेर पडला. रात्री ९.५६ वाजता अल्पवयीन मुलाच्या आईला एक फोन आला. फोन करणाऱ्याने तुमच्या मुलाची भांडणे झाली असून तो जखमी आहे. त्याला आम्ही उपजिल्हा रूग्णालयात नेत आहोत, असे सांगितले. याची माहिती मिळताच जखमी मुलाचे वडील फैयाज बारगीर हे पत्नीसह रूग्णालयात पोहचले. त्यांनी मुलास पाहिल्यावर तो गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. डोक्यात, छातीवर, पाठीवर आणि डाव्या हातावर धारदार हत्याराने वार झाल्याचे निदर्शनास आले.

Advertisement

त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, एका मुलाने त्याला इन्स्टाग्रामवरील शिवीगाळीच्या वादावरून चौकात बोलवले. तिथे अन्य एकजण उपस्थित होता. संशयितांनी त्या अल्पवयीन मुलास तू शिवीगाळ का केलीस? असे विचारले यावरून वाद सुरू झाला. या वादातून एकाने त्याच्याकडील चाकू काढून ले खतम कर, असे म्हणत तो दुसऱ्याकडे दिला. त्यानंतर अल्पवयीन मुलावर सलग वार करत त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी शहाबाज उर्फ छोटा इस्माईल पठाण (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अन्य एका अल्पवयीन मुलाचा यात सहभाग आहे.

जखमी आणि हल्ला करणारा अल्पवयीनच

इन्स्टाग्रामच्या वादातून ज्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला तो अल्पवयीन असून अवघ्या १५ वर्षाचा आहे. तर हल्ला करणारा एक मुलगा अल्पवयीन आहे. त्यांच्यात सोशल मीडियाच्या वादातून झालेल्या या गंभीर हल्ल्याने पालकांसह पोलीसही चक्रावले आहेत. अल्पवयीन मुलांच्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसह पालकांसमोरही असल्याचे या घटनेतून समोर येत आहे.

Advertisement
Tags :

.