कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदारांच्या मतांवर मंत्र्यांची भिस्त

06:02 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य काँग्रेस प्रभारी सुरजेवाला हायकमांडकडे देणार अहवाल : आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

डिसेंबर महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याची चिन्हे असून राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आमदारांची जाणून घेतलेली मते महत्त्वाची ठरणार आहेत. 30 जूनपासून तीन दिवसांच्या आणि 7 जुलैपासून तीन दिवस राज्यातील काँग्रेस आमदारांची वैयक्तिक मते सुरजेवाला यांनी जाणून घेतली आहेत. त्यामुळे अकार्यक्षम व तक्रारी असणाऱ्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मंत्र्यांची कार्यपद्धती, आमदारांच्या मागण्यांना प्रतिसाद, खात्यातील विकासकामांविषयी मते, पक्षसंघटना यासह अनेक मुद्द्यांवर रणदीप सुरजेवाला यांनी आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती ते हायकमांडकडे सादर करतील. गुरुवारी सुरजेवाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची दिल्लीत बैठक घेऊन चर्चा करतील. त्यानंतर मंत्र्यांशीही चर्चा करून कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा सल्ला देऊ शकतात. त्यानंतरही मंत्र्यांविषयी तक्रारी कायम राहिल्या तर डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. सुरजेवालांनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकांमुळे मंत्र्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

सुरजेवाला यांनी बेंगळूर दौऱ्यात दोन टप्प्यात आमदारांशी चर्चा केल्यानंतर कोणते मंत्री प्रभावीपणे काम करत आहेत, कोणत्या आमदाराची कार्यक्षमता व पक्षसंघटनेची कुवत अधिक आहे, याची माहिती जाणून घेतली. ही माहिती ते काँग्रेसश्रेष्ठींकडे सादर करणार आहेत. पुढील पाच महिन्यात अडीच वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी मंत्रिमंडळ पुनर्रचना करताना हायकमांड काही मंत्र्यांना वगळून कार्यक्षम आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे.

दबावतंत्र टाळण्यासाठी...

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकातीलच असल्याने मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांच्या राजकीय प्रभाव पडण्याची शक्यता अधिक आहे. अचानक मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचनेला हात घातला तर अनावश्यक राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. शिवाय सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाने येणारा दबावतंत्र टाळण्यासाठी हायकमांडने आमदारांची मते जाणून घेण्याची कसरत केल्याचे समजते.

आमदारांचे स्थानिक पातळीवर जनतेशी असणारा थेट संबंध, सरकारच्या बाबतीत असणारी मते अधिक वास्तवदर्शी असतील. त्यामुळे सरकारविषयी जनतेत कोणते अभिप्राय आहेत, याची माहितीही हायकमांडपर्यंत पोहोचविणे हा सुरजेवाला यांचा आमदारांसोबतच्या बैठकांचा मुख्य उद्देश होता.

 विविध योजनांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत : सुरजेवाला

मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्याचा विशेष अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. नेतृत्वबदलासंबंधी हायकमांडशी चर्चा करण्यासाठी उभय नेते दिल्लीला गेले नाहीत. केंद्रात बाकी असणाऱ्या राज्यातील योजनांविषयी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत, असे स्पष्टीकरण राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article