For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माझा विजय हा जनतेचा : विशाल पाटील

10:34 AM Jun 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
माझा विजय हा जनतेचा   विशाल पाटील
Vishal Patil
Advertisement

सांगली प्रतिनिधी

माझा विजय हा जनतेचा विजय आहे. ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती. दादा घराण्यावर झालेला अन्याय आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे तिकीट कापले गेले त्यामुळे जनतेने कोणत्याही परिस्थितीत लढायचे असे सांगितले होते. त्यानुसार मी मैदानात उभा राहिलो आणि माझ्या पाठीशी माजी मंत्री विश्वजीत कदम खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे माझा विजय सुकर झाला, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

माझ्या विजयात काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, विक्रम सावंत यांनी प्रयत्न केले. तसेच जतचे आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजीमंत्री अजितराव घोरपडे, स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर पाटील, कै. आमदार अनिल बाबर यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते यांनीही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा घेतलेला निर्णय माझा विजय निश्चित करणारा ठरला आहे. त्याबरोबरच मिरजेतील काही भाजपच्या नगरसेवकांनी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उघडपणे आपला प्रचार केला त्यामुळे हा विजय मिळाला आहे. शेवटी जनतेने मला निवडून दिले. त्यामुळे यापुढे आपण जनतेच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.