मंत्री शिवेंद्रराजेंनी अशक्य ते शक्य करुन दाखवले
सातारा :
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी सर्किट बेंचच्या इमारतीचे काम अवघ्या पंचवीस दिवसात पूर्वीप्रमाणे जशी होती तशीच तयार केली. त्यांनी अशक्य आहे त शक्य करुन दाखवले, त्यांच्या या कार्यामुळे मंत्री शिवेंद्रराजे यांचे नाव गिनिज बुकमध्ये नोंद करायला पाहिजे, असे गौरवोद्गार सरन्यायाधिश भूषण गवई यांनी काढले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्री शिवेंद्रराजे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
कोल्हापूर येथे सर्किट बेंचच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी सरन्यायाधिश भूषण गवई म्हणाले, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी सर्किट बेंचच्या इमारतीचे काम हाती घेतले होते. त्यांनी घेतलेली जबाबदारी ही अशक्य बाब होती. परंतु त्यांनी ती शक्य करुन दाखवली. अवघ्या 20 ते 25 दिवसात त्यांनी इमारतीचे पूर्ण रुप बदलून मुळ रुपात इमारत आणून अतेशय सुंदर असे काम केले. हायकोर्टाला साजेशी अशी इमारत केली आहे. त्यांच्या या कामाची दखल गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली गेली पाहिजे, असे गौरवोद्गार काढले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विशेष अभिनंदन राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांचे केले पाहिजे. त्यांच्या पीडब्ल्यूडी विभागाने अतिशय चांगले काम केले आहे, असे कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मंत्री शिवेंद्रराजे यांनी हेरिटेज लुक ठेवून कोर्टाच्या इमारतीचे काम उत्तम केले आहे, असे गौरवोद्गार काढले.
- शाबासकीमुळे चांगले काम करण्याची प्रेरणा
मंत्री शिवेंद्रराजे याच अनुषंगाने बोलताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शाबासकीमुळे आणि केलेल्या गौरवामुळे अधिक जोमाने आणि जिद्दीने चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. यापुढेही जनतेच्या हिताच्या दृष्टीने काम प्रामाणिकपणे केले जाईल, अशी ग्वाही मंत्री शिवेंद्रराजे यांनी यावेळी दिली.