For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री रवींद्र चव्हाणांचा वाढदिवस समाजपयोगी कार्यक्रमांनी साजरा होणार

04:29 PM Sep 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मंत्री रवींद्र चव्हाणांचा वाढदिवस समाजपयोगी कार्यक्रमांनी साजरा होणार
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात येणार असून उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबीर ,रुग्णांना फळ वाटप,रुग्णालयाला बेडशीट वाटप तसेच धान्य वाटप इत्यादी विविध समाजपयोगी कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली. आज सावंतवाडी भाजपा तालुका कार्यालय येथे नियोजनाची बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष श्री संजू परब, भाजपा जिल्हा चिटणीस श्री चंद्रकांत जाधव,जिल्हा निमंत्रित सदस्य श्री मनोज नाईक, सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष श्री अजय गोंदावले, सावंतवाडी शहर सरचिटणीस श्री परीक्षित मांजरेकर, श्री विनोद सावंत, बांदा मंडळ अध्यक्ष श्री महेश धुरी, आंबोली मंडळ सरचिटणीस, श्री प्रमोद गावडे, युवा मोर्चा बांदा मंडळ अध्यक्ष श्री सिद्देश कांबळी,मळगाव शक्ती केंद्र प्रमुख श्री भास्कर मुननकर , नेमळे बूथ अध्यक्ष श्री सुहास पिकुळकर, श्री प्रवीण वेंगुर्लेकर, सुनील राऊळ तसेच प्रा. श्री गणपत शिरोडकर हे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.