Kolhapur Politics : मंडलिकांच्या टीकेला मंत्री मुश्रीफांचे प्रत्युत्तर; युतीविषयी दिलं स्पष्टीकरण
कागल नगरपरिषदेतील उमेदवारीवरून मुश्रीफांचा मंडलिकांना सवाल
कोल्हापूर : माजी खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ व शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या युतीवरून टीका केली होती. तसेच विविध राजकीय आरोप केले होते. या टिकेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. २००९ मधील लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, या संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर संजय मंडलिक यांनी स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्याशी तुलना करु नये, असा सल्ला माजी खासदार मंडलिकांना दिला.
मनी आणि मसल पॉवरचा वापर करून आपल्या सुनबाईची निवड बिनविरोध केल्याच्या आरोपाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले,नाईकवाडी या मुलीने आमच्या कामावर खुश होऊन स्वतःहून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आम्ही केलेल्या कामाची पोचपावती देत यातून त्या मुलीने आमच्यावर विश्वास दाखवला आहे.ईडीचा प्रश्न कधीच मिटला आहे. याची चौकशीही झाली आहे. यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. माझी ईडीतून न्यायालयाच्या माध्यमातून कधीच सुटका झाली आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांचे हे अज्ञान असल्यानेच ते टीका करत आहेत.
तर समरजित घाटगे यांची तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमिनी आहेत. त्यामुळे जमीनीच्या एका तुकड्यासाठी त्यांना हा निर्णय घेण्याची गरज नाही. तालुक्यात शांतता नांदावी, भांडणे थांबावीत, गावांचा विकास व्हावा व जनहितासाठीच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मंडिलकांनी अभ्यापूर्ण वक्तव्य करावे, असे सांगितले. संजय मंडलिक यांनी कागल नगरपरिषदेत हमिदवाडा कारखान्याचे कार्मचाऱ्यांनाच उमेदवारी दिली आहे. तरीही त्यांना अज्ञातस्थळी नेले आहे. मग तुमचा आपल्या कर्मचाऱ्यांवरही विश्वास नाही काय? असा सवालही मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे.
तर मंडलिक यांनाही युतीत सन्मानाने घेऊ
माजी आमदार संजयबाबा घाटगे, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांची आज भेट झाली. यावेळी आपल्या युतीबाबत सविस्तर बोललो असून दोघेही समाधानी झाले आहेत. आगामी काळात आम्ही तिघेजण एकत्रितपणे कार्यरत राहणार आहेच. त्याचबरोबर संजय मंडलिक यांनाही या युतीत सन्मानाने सहभागी होण्याची विनंतीही आम्ही करत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.