महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेकबाऊन्स प्रकरणी मंत्री मधू बंगारप्पांना 6.96 कोटीचा दंड

06:22 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

चेक बाऊन्स प्रकरणी बेंगळुरातील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांना 6 कोटी 96 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास कारावास भोगावा लागेल, असा निकाल दिलड आहे.

Advertisement

2011 मध्ये मधू बंगारप्पा यांनी दिलेला चेक बाऊन्स झाला होता. याविरुद्ध राजेश एक्पोर्ट कंपनीने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती जे. प्रीत यांनी केली. शुक्रवारी न्यायालयाने 6 कोटी 96 लाख 60 हजार रुपये तक्रारदार कंपनीला आणि 10 हजार रुपये सरकारकडे दंड स्वरुपात जमा करावेत, असा आदेश दिला.

मधू बंगारप्पा यांनी न्यायालयात 50 लाख रुपये देऊन उर्वरित रक्कम दिली नाही. 30 जानेवारीपूर्वी दंड जमा करण्याविषयी हमीपत्र लिहून दिले. मात्र, न्यायालयाने नकार दिला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article