मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर कित्तूरजवळ कार अपघातात जखमी
10:11 AM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळुर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची कार आज सकाळी झाडावर आदळल्याने झालेल्या मोठ्या अपघातातून बचावल्या. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या त्याचा भाऊ चन्नराज हट्टीहोळी सोबत प्रवास करत असताना पहाटे 5 वाजता कित्तूरजवळ हा अपघात झाला. चन्नराज हट्टीहोळी हे कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आहेत. अपघातात टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या कारचा पुढचा भाग पूर्णपणे निकामी झाला. अपघातानंतर एमयूव्हीच्या सर्व सहा एअरबॅग उघडल्या. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीवर व चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली, तर आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement