For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य मॅरेथॉन 2025 : सहभागींसाठी मार्गदर्शन: मार्ग, वेळापत्रक आणि सूचना

12:49 PM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य मॅरेथॉन 2025   सहभागींसाठी मार्गदर्शन  मार्ग  वेळापत्रक आणि सूचना
Advertisement

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व एनजीओ लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य मॅरेथॉन 2025 या बहुप्रतीक्षित उपक्रमाचे आयोजन 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी ६:३० वाजता, आरपीडी कॉलेज ग्राउंड, बेळगाव करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ धावण्याची नाही, तर फिटनेस, शिक्षण, आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देणारे एक अद्वितीय व्यासपीठ आहे. या मॅरेथॉनसाठी भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लाभली आहे. सर्व सहभागी स्पर्धकांनी 11 जानेवारी 2025 रोजी आपले मॅरेथॉन किट आरपीडी कॉलेज ग्राउंड, बेळगाव येथे दुपारी 12:00 ते सायंकाळी 6:00 या वेळेत घेऊन जावे.किटमध्ये बिब, टी-शर्ट, आणि मॅरेथॉनसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश असेल. किट मिळवताना ओळखपत्र व नोंदणी पुष्टीपत्र/ संदेश सोबत आणणे आवश्यक आहे.

Advertisement

मॅरेथॉनसाठीचा मार्ग

  • 10 किमी मॅरेथॉन मार्ग: आरपीडी कॉलेज ग्राउंडपासून सुरू होऊन गोअवेस सर्कल, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिज, मिलिटरी महादेव, पॉप इन, 1ला रेल्वे गेट, 2रा रेल्वे गेट, 3रा रेल्वे गेट, डी-मार्ट, उत्सव सर्कल मार्गे परत त्याच मार्गाने आरपीडी कॉलेज ग्राउंड येथे समाप्त होईल.
  • 5 किमी मॅरेथॉन मार्ग: आरपीडी कॉलेज ग्राउंडपासून सुरू होऊन गोवावेस सर्कल, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिज, मिलिटरी महादेव, पॉप इन, नानावडी क्रॉस मार्गे परत त्याच मार्गाने आरपीडी कॉलेज ग्राउंड येथे समाप्त होईल.
  • 3 किमी मॅरेथॉन मार्ग: आरपीडी कॉलेज ग्राउंडपासून सुरू होऊन गोवावेस सर्कल, मराठा मंदिर मार्गे परत आरपीडी कॉलेज ग्राउंड येथे समाप्त होईल.

पाणीपुरवठा आणि वैद्यकीय केंद्रे

Advertisement

  • आरपीडी कॉलेज ग्राउंड
  • .प्रथम बिल्डिंग
  • मराठा मंदिर
  • मिलिटरी महादेव / पॉप इन्
  • लोकमान्य मॅरीगोल्ड
  • तिसरा रेल्वे गेट
  • उत्सव सर्कल

सर्व स्पर्धक सहभागींच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी मॅरेथॉनच्या मार्गामध्ये पाणीपुरवठा , वैद्यकीय केंद्र आणि आरपीडी कॉलेज ग्राउंड ,मराठा मंदिर,मिलिटरी महादेव / पॉप इन् आणि उत्सव सर्कल अशा ४ ठिकाणी रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांच्या मदतीसाठी आणि अधिक माहितीसाठी ७७९५९ ७२६३५ , ८६१८० ३४०६३ , ८१२३३ ७४८२४ या क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे .ह्या स्पर्धेस दैनिक तरुण भारत ह्यांचे मीडिया पार्टनर , हॉस्पिटॅलिटी पार्टनर आय टी सी हॉटेल तसेच श्री अरिहंत उद्योग आणि एजुकेशन ग्रुप, आय सी आय सी आय लोंबार्ड , युनियन बँक ऑफ इंडिया , उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक , पु. ना. गाडगीळ सराफ आणि जव्हेरी आणि येस बँक यांचे सह प्रायोजक तसेच कॅनरा बँक , ग्लॅमर माफतलाल ,इफको टोकियो जनरल इन्शुरन्स ,रचना इन्फोटेक , सी हॉर्स आणि सिनर्जी सहकार्य लाभले आहे.

Advertisement
Tags :

.