‘सार्वजनिक बांधकाम’च्या विकासकामांचा मंत्री जारकीहोळी यांनी घेतला आढावा
11:02 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गुरुवारी बेंगळूरमधील विधानसौध येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातील विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी विकासकामांचा दर्जा, प्रगती आणि जनतेवर या योजनांवर पडणारा प्रभाव याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या. काही विकासकामे संथगतीने होत असून त्यामागील कारणेही त्यांनी जाणून घेतली. विकासकामांतील अडथळे दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची ताकिदही त्यांनी दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. बैठकीला खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement