कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुन्हा येऊ शकते खाण बंदी

12:32 PM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्लाउड आल्वारीस यांचा सावधगिरीचा इशारा

Advertisement

पणजी : जर गोव्यातील खाण कंपन्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत राहिल्या तर गोव्यात खाणकाम पुन्हा एकदा थांबवले जाऊ शकते. डिचोली - मुळगाव येथे झालेल्या अलीकडील घटनांमध्ये गैर-अनुपालनाचा पुरावा असल्याने आम्ही पुढील आठवड्यात या संदर्भात याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा गोवा फाउंडेशनचे क्लाऊड आल्वारीस यांनी दिला आहे. पिळर्ण येथील गोवा संग्रहालयात एका भाषणात बोलताना आल्वारीस म्हणाले, की 2012 मध्ये शाह आयोगाने गोव्याच्या खाण क्षेत्रातील व्यापक बेकायदेशीर गोष्टी उघड केल्या होत्या, ज्यामुळे राजकारणी, नोकरशहा आणि लीज धारकांमधील संगनमत उघड झाले होते. आयोगाने ही परिस्थिती ‘व्यवस्थेचे  पूर्णपणे पतन’ म्हणून वर्णन केले होते.

Advertisement

त्यानंतर, 2018 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने गोव्याच्या नैसर्गिक संसाधनांच्या ‘अत्याचार शोषणाचा’ निषेध केला होता. 2019 च्या राष्ट्रीय खनिज धोरणानुसार, गोव्याची खनिज संपत्ती तेथील लोकांची आहे. या तत्त्वानुसार, राज्याने विश्वस्त म्हणून काम करायचे आहे आणि खाणकामातून मिळणारे सर्व उत्पन्न सार्वजनिक ट्रस्टमध्ये ठेवले पाहिजे. नॉर्वेसारख्या देशांनी स्वीकारलेल्या मॉडेलप्रमाणेच एकतर नागरिकांना नियमित लाभांश देण्यासाठी किंवा सामूहिक कल्याणासाठी तो निधी वापरला पाहिजे, असे सांगून आल्वारीस यांनी आठवण करून दिली की खाणपट्ट्यांच्या लिलावामुळे काही पारदर्शकता आली असली तरी सध्या काढल्या जाणाऱ्या धातूचे प्रत्येकजण कमी मूल्यांकन करत आहे, ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article