For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खाण, भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्याला पंधरा हजाराची लाच घेताना अटक

12:33 PM Aug 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
खाण  भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्याला पंधरा हजाराची लाच घेताना अटक
Advertisement

जप्त वाळू परत देण्यासाठी मागितली लाच : लोकायुक्तांची कारवाई 

Advertisement

बेळगाव : जप्त केलेली वाळू परत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना खाण व भूगर्भ खात्याच्या एका अधिकाऱ्याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे. फैय्याज अहमद शेख (वय 52) राहणार शिवबसवनगर असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. कुमारस्वामी लेआऊट परिसरातील खाण व भूगर्भ खात्याच्या उपसंचालक कार्यालयात तो काम करतो. लोकायुक्त पोलीसप्रमुख हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील, भरतरेड्डी एस. आर., रवी मावरकर, राजू पाटील, अभिजीत जमखंडी, शशी देवरमनी, बसवराज कोडहळ्ळी, बसवराज हुद्दार, अमूल कोरव, गुड्डप्पा गोरवर, प्रकाश माळी आदींनी ही कारवाई केली आहे.

अथणी येथील शीतल गोपाल सनदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. शीतल यांच्याशी परिचित असलेले कंत्राटदार बी. के. मगदूम यांना ऐनापूर येथील एस. सी. कॉलनीत रस्ते निर्मितीसाठी वाळूची गरज होती. ऐगळी येथे जप्त केलेली वाळू पुरवण्यासंबंधी टास्क फोर्सने दर निश्चित करून आदेश दिला होता. जप्त वाळू परत देण्यासाठी फैय्याज यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावेळी शीतल यांनी ही रक्कम कमी करण्याची विनंती केल्यानंतर 15 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. गुरुवारी लोकायुक्त पोलीस निरीक्षक एच. एस. होसमनी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केले होते. 15 हजार रुपये लाच स्वीकारताना छापा टाकून या अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.